एक्स्प्लोर
आता सोलापूरमध्येही पासपोर्ट सेवा केंद्र
सोलापूरमध्ये रविवारी 30 जुलै रोजी पासपोर्ट कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. सोलापूरच्या ऐतिहासिक रिपन हॉलमध्ये हे पासपोर्ट कार्यालय सुरु होईल. सोलापूरसह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना या पासपोर्ट कार्यालयाच्या माध्यमातून पासपोर्ट दिला जाणार आहे.
सोलापूर : सोलापूरमध्ये रविवारी 30 जुलै रोजी पासपोर्ट कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. सोलापूरच्या ऐतिहासिक रिपन हॉलमध्ये हे पासपोर्ट कार्यालय सुरु होईल. सोलापूरसह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना या पासपोर्ट कार्यालयाच्या माध्यमातून पासपोर्ट दिला जाणार आहे.
सोलापूरसह सांगली, सातारा, आणि उस्मानाबादच्या नागरिकांना पासपोर्टसाठी आतापर्यंत पुण्याला यावं लागत होतं. सोलापूरमध्ये पासपोर्ट केंद्र सुरु झाल्यावर नागरिकांना आपल्या जवळचं केंद्र निवडता येणार आहे.
पासपोर्टसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भराल?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. www.passport.gov.in वर जाऊन सर्वात आधी नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी वैध इमेल आयडी, मोबाईल नंबर देणं गरजेचं आहे.
पासपोर्टसाठी वेबसाईटवर अकाऊंट बनवल्यावर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत.
ऑनलाईन डेटा एन्ट्री
ऑनलाईन डेटा अपलोड करुन फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे चांगलं इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे. कारण फॉर्म भरताना नेट बंद झाल्यास तुम्हाला संपूर्ण फॉर्म पुन्हा भरावा लागेल.
ऑफलाईन डेटा एन्ट्री
ऑफलाईन ऑर्म भरण्यासाठी वेबसाईटवर वेगळा पर्याय देण्यात आला आहे. हा पर्याय निवडल्यास एक पीडीएफ फाईल डाऊनलोड होते. ऑफलाईन डेटा पीडीएफमध्ये भरुन सेव्ह केल्यावर एक्सएमएल फाईल तयार होते, जी अपलोड केल्यावर आपला डेटा वेबसाईटवर अपलोड होतो.
पासपोर्टसाठी दोन प्रकार देण्यात आले आहेत
इसीआर आणि नॉन इसीआर
म्हणजेच इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड आणि इमिग्रेशन चेक नॉट रिक्वायर्ड
दहावीपर्यंत शिक्षण झालेल्यांना इसीआर प्रकारातून अर्ज करावा लागतो तर नॉन इसीआर साठी दहावीनंतरचं बारावी किंवा पदवीचं प्रमाणपत्र गरजेचं आहे.
पाहा व्हिडिओ
सध्याच्या वास्तव्याची कागदपत्रं | |
1 | पाणीपट्टीची पावती |
2 | फोन बिल |
3 | वीज बिल |
4 | इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर |
5 | मतदान ओळखपत्र |
6 | गॅस कनेक्शन |
7 | प्रतिष्ठित कंपनीच्या लेटरहेडवरील एम्प्लोयमेंट लेटर |
8 | पती किंवा पत्नीच्या पासपोर्टची झेरॉक्स (त्यावरील पत्ता एकच असणं आवश्यक) |
9 | अल्पवयीन मुलांसाठी पालकांच्या पासपोर्टच्या शेवटच्या पानाची झेरॉक्स |
10 | आधार कार्ड |
11 | रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट |
12 | फोटो पासबुक (राष्ट्रीयीकृत बँका, प्रायव्हेट सेक्टर बँका, आणि प्रादेशिक ग्रामीण बँका) |
वयाची माहिती देणारी कागदपत्रं | |
1 | जन्माचा दाखला |
2 | शाळा सोडल्याचा दाखला किंवा ट्रान्सफरन्स सर्टिफिकेट |
3 | एलआयसी बॉण्ड |
4 | सरकारी कर्मचारी असल्यास सर्व्हिस रेकॉर्ड |
5 | आधार कार्ड |
6 | मतदान ओळखपत्र |
7 | पॅन कार्ड |
8 | ड्रायव्हिंग लायसन्स |
9 | अनाथ असल्यास अनाथालयाच्या लेटरहेडवर जन्मतारखेचा उल्लेख असलेलं पत्र |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement