एक्स्प्लोर
मंगळवेढ्यातील 'त्या' तरुणीची विष पाजून हत्या, आरोपी आई-वडिलांची कबुली
मंगळवेढा तालुक्यातील सलगरमध्ये मनाविरुद्ध लग्न केल्याच्या रागातून मुलीची विष पाजून हत्या केल्याचं आरोपी आई-वडिलांनी कबूल केलं आहे. आरोपींकडून मयत तरुणीच्या नवऱ्याला आणि कुटुंबालाही धमक्या मिळू लागल्याने त्यांच्यावर गाव सोडण्याची वेळ आली आहे.
पंढरपूर | मंगळवेढा तालुक्यातील सलगरमध्ये मनाविरुद्ध लग्न केल्याच्या रागातून मुलीची विष पाजून हत्या केल्याचं आरोपी आई-वडिलांनी कबूल केलं आहे. आरोपींकडून मयत तरुणीच्या नवऱ्याला आणि कुटुंबालाही धमक्या मिळू लागल्याने त्यांच्यावर गाव सोडण्याची वेळ आली आहे.
शेतातील सालगड्याच्या मुलासोबत लग्न केल्याच्या रागातून ऑनर किलिंगची घटना मंगळवेढ्यातील सलगर बुद्रुक इथे घडली होती. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची घरच्यांनी हत्या केल्याचं समोर आलं होतं.
सलगरमधील अनुराधा बिराजदार ही कर्नाटकमधील सिंदगी इथे बीएएमएसचे शिक्षण घेत होती. त्यांच्यात शेतातील सालगड्याच्या मुलासोबत अनुराधाने 1 ऑक्टोबरला लग्न केलं होतं. यानंतर अनुराधा मामाच्या बोराळे इथल्या घरी राहत होती. पण या लग्नामुळे संतापलेले वडील अनुराधाला मामाच्या घरातून गेले. त्यानंतर 4 ऑक्टोबरच्या पहाटे शेतात हत्या करुन अंत्यसंस्कार केले.
ऑनर किलिंग प्रकरणी मुलीचे मामा बाळासाहेब म्हमाने यांच्या तक्रारीवरुन वडील विठ्ठल आणि सावत्र आई श्रीदेवी बिराजदार यांना पोलिसांनी अटक केली आहे. अनुराधाने मामाच्या घरी असताना वडिलांपासून जिवाला धोका असल्याच्या चिठ्ठ्या लिहून ठेवल्याचीही माहिती समोर येत होती. या चिठ्ठ्या मंगळवेढा पोलिसांच्या ताब्यात आहेत.
दरम्यान आरोपींकडून धमक्या मिळत असल्याने तरुणीच्या पतीने कुटुंबासह आपल्या कर्नाटकातील गावी स्थलांतर केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement