Parbhani : घरात झोपलेल्या वृद्ध पती-पत्नीचा  हत्या करून अन्य एका महिलेला गंभीर जखमी केल्याची थरारक घटना परभणी(Parbhani)च्या असोल्यात घडलीय. ही हत्या का आणि कुणी केले याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी या थरारक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.


परभणी तालुक्यातील असोल्यात 70 वर्षीय शंकरराव रिक्षे हे आपल्या 60 वर्षीय पत्नी सारजाबाई रिक्षे यांच्यासमवेत राहतात.काल 15 मार्च रोजी त्यांच्याकडे सारजाबाई यांची बहीण गिरिजाबाई अडकिने या एका तरुणाला सोबत घेऊन असोल्यात आल्या होत्या. सर्व जण  रात्री जेवण करून झोपले. मात्र सकाळी कुणीच उठलेले दिसलं नसल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिला तर आत शंकरराव रिक्षे त्यांची पत्नी सारजाबाई रिक्षे व गिरिजाबाई अडकिने हे तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले त्यांच्यावर धारदार शास्त्राने वार केलेलं होते.शेजाऱ्यांनी हि बाब तात्काळ पोलिसांनी कळवली यावेळी ताडकळस पोलीस घटनस्थळी पोचले तेंव्हा शंकरराव रिक्षे,पत्नी सारजाबाई रिक्षे यांचा मृत्यू झाला होता तर गिरिजाबाई अडकिने या गंभीर जखमी झालेल्या आढळल्याने त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि तिथून नांदेड येथे हलवण्यात आले.मात्र गिरिजाबाई यांच्या सोबत आलेला तरुण बेपत्ता होता.


घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी श्वान पथक, फिंगर प्रिंट तज्ञाना पाचारण केले.सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.हे खुन नेमके कुणी केले?तो तरुण कोण होता ? या सर्व बाबींचा तापास पोलीस करत आहेत.दरम्यान या घटनेने असोल्या बरोबरच परभणीत हि खळबळ उडाली असुन खून करणाऱ्याने पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha