Maharashtra Ulhasnagar Crime News : जन्मठेपेच्या फरार कैद्याला तब्बल 23 वर्षांनी अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. उल्हासनगर क्राईम ब्रॅंचने सापळा रचून गुन्हागाराला अटक केली आहे. पत्नीच्या खुनात सदर व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. 1999 मध्ये गुन्हेगार फर्लो रजेवर तुरुगांतून बाहेर आला होता. त्यानंतर तो फरार होता. आता तब्बल 23 वर्षानंतर पोलीसांनी त्याला सापळा रचून अटक केली आहे. रमेश उर्फ दिनेश तायडे असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
रमेश उर्फ दिनेश तायडे या फरार गुन्हेगारालारा 23 वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. या कैद्याचे वय 53 वर्ष आहे. रमेश याने 1995 साली गुजरातमध्ये त्याच्या पत्नीला जाळून तिची हत्या केली होती. याप्रकरणी सुरत जिल्ह्यातील लिंबायत पोलीस ठाण्यात त्याच्यावर हुंडाबळी आणि खुनाचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात न्यायालयानं रमेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होत. त्यानंतर रमेश बडोदा कारागृहात शिक्षा भोगत होता.
शिक्षा भोगत असताना रमेश 27 नोव्हेंबर 199 रोजी फर्लोच्या सुट्टीवर बाहेर आला. मात्र सुट्टी संपल्यानंतरही रमेश जेलमध्ये परतलाच नाही. तेव्हापासून रमेश फरार होता. त्याला उल्हासनगरच्या सुभाष टेकडी भागातील भरत नगरमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रॅंचला मिळाली. त्यानुसार क्राईम ब्रँचनं सापळा रचून रमेश तायडे याला अटक केली. त्याला आता पुन्हा एकदा गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. रमेशची रवानगी उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा एकदा जेलमध्ये केली जाणार असल्याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
Vasai Crime : वसईत प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकराची बिहारमधील हॉटेलमध्ये आत्महत्या
Satara Crime News : एकतर्फी प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीची हत्या, चाकूने वार करत केला खून
फोटोशूटसाठी गेलेल्या 3 तरुणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू, पुणे जिल्ह्यातील दुर्घटना
Mumbai Bank : मुंबै बँक बोगस कर्ज वाटप प्रकरणी दरेकर, धसांच्या अडचणीत वाढ; गुन्हे दाखल करण्याचे आदेश
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live