Flood Relief Fund scam Osmanabad : राज्यात 2019 साली सांगली, कोल्हापुरात (Sangli Kolhapur Flood Updates) आलेल्या पुराने अनेकांचं जीवन उद्धवस्त झालं. या पुरानं अनेकांना बेघर केलं. यानंतर राज्यासह देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला. नागरिकांना मदत करण्यासाठी प्रत्येक स्तरातील लोक पुढं आले. उस्मानाबाद जिल्ह्यातील  जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी निधी गोळा केला होता. त्या निधीपैकी 14 लाख 83 हजारांवर अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. 


तीन वर्षापूर्वी सांगली, कोल्हापूर येथे पुराने थैमान घातले होते. या पुरात कित्येक कुटुंबाचे नुकसान झाले होते. कित्येक कुटुंबं उघड्यावर आली होती. या कुटुंबांसाठी राज्यातून मदत येत होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील आधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पुरग्रस्तांसाठी 23 लाख 83 हजार 513 रुपये निधी गोळा केला होता. त्यापैकी 9 लाख एक हजार 410 रुपयाच्या वस्तुंचे वाटप सांगली येथील पुरग्रस्तांना केले होते.
 
उर्वरित निधीच्या नियोजन बाबत 27 सप्टेंबर 2019 मध्ये बैठक झाली होती. यावेळी सर्व आधिकारी उपस्थित होते पण नियोजन झाले नसल्यामुळे शिल्लक निधी 14 लाख 83 हजार 103 रुपये निर्णय झाला नाही. नंतर कोरोना काळात अनेक अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या आणि याच काळात निधी संकलनाच्या संचिका गहाळ झाली.


अधिकाऱ्याच्या बदल्यानंतर गहाळ झालेली संचिका अचानक अवतरली असून यातील शिल्लक निधीवर मात्र डल्ला मारल्याचे दिसून आले. शिल्लक निधी कुठे खर्च झाला? कुठे वाटले? काय वाटप केले? कुणी वाटप केले? काय खरेदी केले? याचा साधा उल्लेख देखील या संचिकेत नाही हे विशेष. मग निधी कुठे गेला हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.



इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha