एक्स्प्लोर
पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेच्या प्रचारतोफा थंडावल्या
![पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेच्या प्रचारतोफा थंडावल्या Panvel Bhiwandi Malegaon Municipal Corporation Campaign Last Day Live Update पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेच्या प्रचारतोफा थंडावल्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/22172315/panvel-palika.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पनवेल : पनवेल, भिवंडी आणि मालेगाव या महापालिकांच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. शेवटच्या मतदारापर्यंत पोहचण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करताना दिसले. शेवटच्या दिवशी सर्वाधिक रॅली आणि सभा झाल्या.
पनवेल, भिवंडी आणि मालेगाव या महापालिकांसाठी 24 तारखेला मतदान होणार आहे, तर 26 तारखेला मतमोजणी होऊन तिन्ही पालिकांवर कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार, याचा निकाल हाती येणार आहे.
अलिकडेच स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेसाठी पहिल्यांदाच मतदान होत आहे. त्यानिमित्त पालिकेकडून मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. मतदान हा आपला मुलभूत अधिकार असल्यानं पनवेलकरांनी निर्भयपणे मतदान करावं, असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं.
ढोल ताशांचा गजर, वासुदेव, मतदार राजाचा रथ यांसह जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत अभिनेत्री तेजा देवकर सहभागी झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)