एक्स्प्लोर
मोबाईलमधून कॅमेरा हद्दपार करण्याची विनंती करणार : पंकजा
पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आपण मोबाईलमधील कॅमेराच काढून टाका, अशी विनंती करणार असल्याची खोचक टिप्पणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी केली आहे.
कुठल्याही कार्यक्रमात लोकांशी, कार्यकर्त्यांशी या सेल्फीच्या नादामुळे साधा संवादही होत नाही, असं पंकजा म्हणाल्या. त्या आज पिंपरी चिंचवडमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या जयंती कार्यक्रमात बोलत होत्या.
कुठेही गेलो की लोक कायम सेल्फी आणि कॅमेऱ्यातच गुरफटलेले असतात. त्यामुळे तरुणाईला जरा शिस्तीची वेसण लावणं गरजेचं आहे, असं म्हणत पंकजांनी सेल्फीवाल्यांचे कान उपटलेत.
याशिवाय राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांनी भाजपचा रस्ता धरल्याने पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीमुक्त होणार, यात शंका नसल्याचंही पंकजा म्हणाल्या.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement