एक्स्प्लोर
येवल्यातील ‘गोल्डन मॅन’च्या सोन्याच्या शर्टची गिनीज बुकमध्ये नोंद
येवला : येवल्यातील उद्योगपती आणि माजी उपनगराध्यक्ष पंकज पारख यांच्या सोन्याच्या शर्टची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. या शर्टची किंमत 98 लाख रुपये 35 हजार 99 रुपये आहे.
लहापणापासून सोनं घालण्याची हौस असल्यानं आपणा खास सोन्याचा शर्ट घातल्याचं पारख यांनी म्हटलं होतं आणि या सोन्याच्या शर्टाची गिनीज बुकात नोंद व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. त्यासाठीचं एक पथक येवल्यात आल्यानंतर त्यांनी शर्टची माहिती घेतली आणि काल त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुकात झाल्याचं पंकज पारख यांना सांगण्यात आलं आहे.
गळ्यात सोन्याच गोफ, चैन, हातात अंगठ्या असल्याने त्यांना येवल्याचे ‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळखले जात असत.आपल्या या शर्टची कुठेतरी नोंद व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या या सोन्यच्या शर्टची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याच वृत्त येवल्यात समजताच अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement