एक्स्प्लोर
पंढरीत विठ्ठलभक्ताला मारहाण करणाऱ्या पुजाऱ्याचं निलंबन
![पंढरीत विठ्ठलभक्ताला मारहाण करणाऱ्या पुजाऱ्याचं निलंबन Pandharpur Priest Suspended For Beating Devotee Live Update पंढरीत विठ्ठलभक्ताला मारहाण करणाऱ्या पुजाऱ्याचं निलंबन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/17100713/05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर : पंढरीतल्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यात भक्ताला मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशोक भंडगे असं मारकुट्या पुजाऱ्याचं नाव असून तीन दिवसांपूर्वी विठ्ठलाच्या मूर्तीला हार घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका भक्ताला त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होता.
'एबीपी माझा'नं या मारहाणीला वाचा फोडल्यानंतर मंदिर समितीनं त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचं आश्वासन दिलं आहे. पुढील आदेश येईपर्यंत अशोक भंडगे निलंबित राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
विठ्ठलाच्या गळ्यात हार घातल्याने पंढरपुरात पुजाऱ्याची भाविकाला मारहाण
दत्तात्रय सुसे असं या भाविकाचं नाव आहे. सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय हे गाभाऱ्यात पोहोचले, तेव्हा हार घालताना पुजाऱ्यांनी त्यांना रोखलं, त्यामुळे झालेल्या वादानंतर पुजाऱ्याने कानशिलात मारल्याचा आरोप सुसे यांनी केला आहे. पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये भणगे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)