एक्स्प्लोर

"मी सर्वात सुखी अन् आनंदी शेतकरी, कारण माझी जमीन आनंदी" ; गेल्या 10 वर्षांपासून नैसर्गिक शेती करणारा अवलिया इंजिनियर

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनियरिंगची पदवी घेतल्यावर हमाली करिन पण शेती करणार नाही म्हणून त्याने ठेकेदारी सुरु केली. मात्र राजकारणाचा तिटकारा आणि सरळसोट स्वभाव यामुळे ठेकेदाराचे छक्के पंजे जमेनात आणि मग शेवटी शेतीकडे वळला आणि तत्वे जपत गेली 10 वर्ष 100 टक्के नैसर्गिक शेती करीत त्याने अनेक चमत्कार घडवून दाखवले आहेत.  

पंढरपूर : आजपर्यंत आपण अनेकांच्या शेतीच्या यशोगाथा, शेतीमध्ये केलेले आधुनिक प्रयोग यावर विषेश गोष्टी पहिल्या ऐकल्या आहेत. आज आपण एका अशा अवलिया शेतकऱ्याची कहाणी पाहणार आहोत. ज्याचं आयुष्य एका पुस्तकामुळे बदलून गेलं. आणि त्यानं आधुनिक शेती सोडून थेट नैसर्गिक शेती सुरु केली. शेतकऱ्याच्या आयुष्यात हा बदल झाला आहे, जपानचे शास्त्रज्ञ मासानोबु फुकुओका यांच्या एका काडातून क्रांती या पुस्तकातून.

तसं पहिले तर एका साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांचा हा मुलगा. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनियरिंगची पदवी घेतल्यावर हमाली करिन पण शेती करणार नाही म्हणून त्याने ठेकेदारी सुरु केली. वडील एका नामांकित सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. म्हणजे तशी सुबत्ता असल्यामुळे कसली काळजी किंवा चिंता असायचे कारण नव्हते. मात्र राजकारणाचा तिटकारा आणि सरळसोट स्वभाव यामुळे ठेकेदाराचे छक्के पंजे जमेनात आणि मग शेवटी शेतीकडे वळला आणि तत्वे जपत गेली 10 वर्ष 100 टक्के नैसर्गिक शेती करीत त्याने अनेक चमत्कार घडवून दाखवले आहेत.  
    
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील वासुदेव गायकवाड यांची ही कहाणी खरंच रासायनिक शेतीमुळे काळ्या आईची दुरावस्था पाहत असणाऱ्या इतर शेतकऱ्यांनी जाणून घेण्यासारखी आहे. तसे अतिशय बुद्धिवान आणि वाचनाची आवड असणारे गायकवाड यांनीही सुरुवातीला पाच वर्षे इतरांसारखी रासायनिक शेती केली. चक्क द्राक्षे आणि डाळिंब सलग पाच वर्षे युरोपात निर्यात केली. पण हे सर्व करताना रासायनिक खतांमुळे जमिनीची होत चाललेली दुरावस्था लक्षात आली आणि जपानचे शास्त्रज्ञ मासानोबु फुकुओका यांचे पुस्तक वाचनात आले. यातूनच गायकवाड यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. यामुळेच त्यांनी रासायनिक शेतीऐवजी नैसर्गिक शेतीचा पर्याय निवडला.  



       
सोलापूर द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष अशी ओळख असलेले वासुदेव गायकवाड आता या झगमगत्या जगापासून नैसर्गिक शेतीकडे वळले. शेतीतील वाढते रासायनिक खतांचे प्रमाण आणि यामुळे जमिनीची कमी होणारी सुपिकता आणि पिकांमध्ये वाढत चाललेले विष या गोष्टीमुळे गायकवाड यांनी शंभर टक्के नैसर्गिक शेती करायची ठरवली.  जपानचे शास्त्रज्ञ मासानोबु फुकुओका यांनी 50 वर्षाच्या प्रयोगातून हे सिद्ध करून दाखवलं आणि याचा रिझल्ट आता गायकवाड यांना मिळत आहे .

वासुदेव गायकवाड यांच्या 30 एकर जमिनीमध्ये त्यांनी 8 एकरमध्ये केशर आंब्याची झाडे लावली आहेत. तर 10 एकरमध्ये सीताफळ आणि पाच एकरमध्ये त्यांनी जंगल निर्माण केलंय ते ही चंदन शेती साठी आता त्यात नैसर्गिक रित्या 400  चंदनाची झाडं आपोआप आली आहेत.

गायकवाड यांची शेती आता शेती नसून जंगल बनत चाललं असून या शेतीला ते फक्त उसाचे पाचट एवढेच बाहेरून आणतात. तेही लहान रोपण दिलेल्या ड्रीपच्या पाण्याची ओल टिकावी म्हणून. त्यांच्या शेतीत कुठेही तण काढलेले दिसत नाही ना कोठे साफसफाई. गेल्या 10 वर्षांपासून ना शेतीत नांगरट करतात ना कुळवणी. निसरहत जसे असते अगदी तशीच झाडे वाढवायचा त्यांचा प्रयत्न असतो. यामुळे इतरांप्रमाणे यांच्याही बॅहॅवर कीड येते, मात्र त्यालाही ते काही करत नाहीत. जी कीड येते त्याला संपवणारे दुसरे किडेही निसर्गात असतात आणि ते त्यांना नैसर्गिक रीतीने संपवतात असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या शेतातील ट्रॅक्टर आणि इतर शेतीची अवजारे गंजत पडली आहेत. एकाबाजूला रासायनिक औषधे आणि खतांचा वापर करून जमिनीचा पोत संपत चालला असताना गेल्या 10 वर्षात माझ्या जमिनीचा पोत खूप वाढल्याचे गायकवाड सांगतात. भविष्यात तर या विषारी रासायनिक शेतीमुळे मोठ्या प्रमाणात जमिनी नापीक होतील, त्यावेळी माझी जमीन सगळ्यात जास्त कसदार असेल. त्यामुळे आजही रासायनिक खाते वापरून येणाऱ्या उत्पन्नापेक्षा माझे उत्पन्नही जास्त आहे आणि त्यापेक्षा माझी जमीन आणि मी दोघेही समाधानी असल्याचा त्यांचा विश्वास आहे. माझी आणि माझ्या शेतीच्या गरजाच कमी असून मिळणारे उत्पन्न मी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप जास्त असल्याचे त्यांचे मानणे आहे. 

गायकवाड यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही मेकॅनिकल इंजिनियर असून त्यांनाही या नैसर्गिक शेतीची आवड आहे. गायकवाड यांचा मुलगा सध्या UPSC परीक्षेची तर मुलगी MPSC स्पर्धा परीक्षांची तयारीही शेतातील झाडाखाली बसून करतात. गायकवाड यांच्या घरात 30 पेक्षा जास्त मांजरे असून त्यांच्यामुळे शेतात ना उंदीर आहेत ना साप, कितीही मोठा आणि कोणताही साप निघाला तरी ही मांजरे त्याचा लगेच फडशा पडून मोकळी होतात. 

सध्या गायकवाड यांच्या शेतात जमिनीला आंबे चिकटले असून यातही त्यांनी एक एकर अति सघन पद्धतीने लावल्याने त्याला चौथ्या वर्षीच उत्पादन मिळायला सुरुवात झाली आहे . दुसऱ्या बागेत येणाऱ्या आंब्याला सनबर्नचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी पेपर लावले आहेत. झाडावर लगडलेल्या या विषमुक्त केशर आंब्याला मोठी मागणी येत आहे. विशेष म्हणजे अजून हा आंबा उतरायला वेळ असला तरी सोशल मीडियावर वासुदेव गायकवाड यांच्या फेसबुक चॅनलला पहाणारे देशभरातील शेकडो मंडळी त्यांच्याशी संपर्क साधत असतात.  इतर कोणत्याही आंब्यापेक्षा माझ्या नैसर्गिक आंब्याची चव खाणारे कायम लक्षात ठेवतील असा दावा वासुदेव गायकवाड करतात. इतरांपेक्षा दर्जेदार आंबा माझाच असणार असून सर्वाधिक दरही मलाच मिळणार एवढा विश्वास त्यांना त्यांच्या नैसर्गिक शेतीवर आहे. यावर्षी 30 टन आंबा येणार असून यातून किमान 30 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल असा वासुदेव गायकवाड यांना विश्वास आहे. शेतीतून फक्त पैसा मिळवणे त्यांचा हेतू नसून यासोबत आपली शेती पुढच्या पिढ्यान अशीच कसदार राहावी आणि यातून समाजाला विषमुक्त नैसर्गिक स्वरूपातील सकस अन्न द्यावे  हाच त्यांचा हेतू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Embed widget