Nagar Panchayat Election Result: पालघर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. विक्रमगड तलासरी आणि मोखाडा या नगरपंचायतीमध्ये चुरशीच्या लढतीत पाहायला मिळाल्या. विक्रमगडमध्ये सर्वच पक्षांना धूळ चारत जिजाऊ संघटना प्रणित विक्रमगड विकास आघाडीने 17 पैकी 16 जागांवर दणदणीत विजय मिळवत एक हाती सत्ता काबीज केली. तर, मोखाडा नगरपंचायती मध्ये शिवसेनेला 17 पैकी 8 जागा मिळाल्या असल्या तरीही भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आणि जिजाऊ संघटना यांना मिळून नऊ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे येथे शिवसेनेची पीछेहाट झालेली पाहायला मिळाली. परंतु या दोन्ही नगरपंचायती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांना मोठा धक्का बसला आहे.
तलासरी मध्ये सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची पीछेहाट झालेली पाहायला मिळाली. या नगरपंचायती मध्ये सुद्धा निकालानंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाले आहे. त्यामुळे विक्रमगडची एक हाती सत्ता जिजाऊ संघटनेकडे गेली असली तरीही मोखाडा आणि तलासरी मध्ये कोण सत्ता काबीज करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तलासरी नगरपंचायती मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणूचे आमदार विनोद निकोले आणि पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या नगरपंचायती मध्ये पहिल्यांदाच शिवसेनेने आपला झेंडा रोवला असून तीन जागा काबीज करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे या ठिकाणी एकमेकांचे तिरस्कार करणारे पक्ष एकत्र येतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सर्वच पक्षाच्या दिग्गजांनी हजेरी लावली होती शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तिन्ही नगरपंचायती साठी सभा घेतल्या होत्या मात्र तलासरी वगळता शिवसेनेच्या हाती जास्त काही पडल्याचं दिसत नाही मोखाडा नगरपंचायत मध्ये यापूर्वी एक हाती शिवसेनेची सत्ता होती मात्र येथे विराट सभा घेऊन सुद्धा वजाबाकी पाहायला मिळाली. तर विक्रमगड मध्ये सुद्धा एका जागेवर समाधान मानावे लागले आहे
तलासरी नगरपंचायत निवडणूक-
एकूण जागा- 17
पक्ष | विजयी जागा |
माकप | 06 |
भाजप | 06 |
अपक्ष | 01 |
काँग्रेस | 01 |
विक्रमगड नगर पंचायत-
एकूण जागा- 17
पक्ष | विजयी जागा |
जिजाऊ संघटना (अपक्ष) | 16 |
शिवसेना | 01 |
मोखाडा नगर पंचायत निकाल-
एकूण जागा- 17
पक्ष | विजयी जागा |
शिवसेना | 08 |
राष्ट्रवादी | 04 |
भाजप | 02 |
जिजाऊ संघटना | 02 |
काँग्रेस | 01 |
- हे देखील वाचा-
- Sangli Nagar Panchayat Election Result 2022 : कवठे महांकाळमधून रोहित पाटलांची जोरदार एन्ट्री तर कडेगावात विश्वजित कदमांना धक्का
- Nagar Panchayat Elections 2022 Result Live : नगरपंचायत, झेडपीचा रणसंग्राम; निकालात कुणाची सरशी, पाहा प्रत्येक अपडेट
- Jalna Nagar Panchayat Election Result 2022 : जालना नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व; तर भाजप, शिवसेनेला प्रत्येकी 1 जागा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha