Jalna Nagar Panchayat Election Result 2022 : जालना जिल्ह्यातील पाचवी नगर पंचायतीचे निकाल हाती आले असून पाच नगरपंचायती पैकी तीन नगरपंचायतींवर राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. तर भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. जिल्ह्यातील राजेश टोपे यांचा गड असलेल्या घनसांगी तालुक्यातील घनसावंगी आणि तीर्थपुरी या नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आली आहे. यापूर्वी घनसावंगी नगरपंचायत राष्ट्रवादीच्याच ताब्यात होती. तर तीर्थपुरी या नव्यानं अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतींवर राजेश टोपे यांनी आपं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद नगरपंचायतीमध्ये एका पक्षाला बहुमत मिळालं नसलं तरी सर्वाधिक सात जागा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं नंबर एकचा पक्ष म्हणून वर्चस्व दाखवलं आहे. त्याखालोखाल काँग्रेसला देखील सहा जागा या ठिकाणी मिळाल्या असून जाफराबाद नगरपंचायती वरती राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून सत्ता प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील मंठा नगरपंचायतीवर शिवसेनेला 17 पैकी 12 जागा मिळाल्या असून एक हाती सत्ता परत प्रस्थापित केली आहे. या ठिकाणी भाजप नेते माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. तर बदनापूर नगरपंचायतीवर भाजपनं 9 जागा घेऊन आपला विजय प्रस्थापित केला आहे.
जालना जिल्हा नगरपंचायत अंतिम निकाल :
नगरपंचायत निवडणुकीतील विजयी पक्ष
1. घनसावंगी : राष्ट्रवादी
2. तिर्थपूरी : राष्ट्रवादी
3. मंठा : शिवसेना
4. बदनापूर : भाजप
5. जाफराबाद : राष्ट्रवादी/काँग्रेस
घनसावंगी नगरपंचायत (एकूण जागा 17)
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मतदारसंघातील घनसावंगी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता
- राष्ट्रवादी काँग्रेस : 10
- शिवसेना : 7
- भाजप : 0
- शिवसेना : 0
- अपक्ष : 0
तिर्थपुरी नगरपंचायत
तिर्थपुरी नवीन अस्तित्वात आलेली नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात असून एकूण 17 जागा आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या घनसावंगी मतदार संघात नव्यानं अस्तित्वात आलेली ही नगरपंचायत राष्ट्रवादीकडे खेचण्यात यश आलं आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेस : 11
- भाजप : 2
- शिवसेना : 3
- अपक्ष : 1
बदनापूर नगरपंचायत (एकूण जागा 17)
बदनापूर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. बदनापूर नगर पंचायतीमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेस : 5
- भाजप : 9
- काँग्रेस : 1
- शिवसेना : 0
- अपक्ष : 2 (भाजप पुरस्कृत)
जाफराबाद नगरपंचायत
जाफराबाद नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.
- राष्ट्रवादी : 7
- काँग्रेस : 6
- भाजप : 1
- अपक्ष : 3 (भाजप पुरस्कृत)
मंठा नगरपंचायत (एकूण जागा 17)
मंठा नगरपंचायतीवर शिवसेनेची एकहाती सत्ता. भाजपचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, तसेच काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड यांना धक्का देत पुन्हा शिवसेनेनं सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे.
- शिवसेना : 12
- राष्ट्रवादी काँग्रेस : 1
- काँग्रेस : 2
- भाजप : 2
- अपक्ष : 0
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांसाठी काल (मंगळवारी) मतदान पार पडलं. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या 23 आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठीही मतदान पार पडलं. 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी काल सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरु झालं होतं. याशिवाय 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्त जागांसाठीही मतदान काल मतदान झालं. आज (बुधवार) निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- NagarPanchayat Elections Result : बच्चूभाऊंचा 'प्रहार'! संग्रामपूर नगरपंचायत एकहाती जिंकली, दिग्गजांना धक्का
- Karjat Nagarpanchayat Election Result : कर्जत नगरपंचायतीवर रोहित पवारांची जादू! मिळवली एकहाती सत्ता, राष्ट्रवादी 12 जागांवर विजयी
- Kavathe mahankal result : निवडणुकीपूर्वी म्हणाले, माझा बाप नक्की आठवेल, आता रोहित पाटील म्हणतात, आबा मिस यू!
- Nanded Nagar Panchayat Election : नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची बाजी, दोन नगरपंचायतींवर काँग्रेस तर एका ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता