Sangrampur NagarPanchayat Elections Result : राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं बुलढाण्यातील संग्रामपूर नगरपंचायतीत एकहाती बाजी मारली आहे. बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीच्या 12 उमेदवार निवडून आले असून काँग्रेसला 4 तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर भाजपला एकही जागा मिळालेली नाही. मंत्री राजेंद्र शिंगणे आणि संजय कुटे या दोघांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
संग्रामपूर नगर पंचायतीचे अंतिम निकाल
प्रहार - 12
काँग्रेस - 04
शिवसेना - 01
कवठे महांकाळ नगरपंचायतीवर रोहित पाटलांचा वरचष्मा
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी अखेर करुन दाखवलं आहे. राष्ट्रवादीने कवठेमहांकाळ नगरपंचायत (kavathe mahankal nagar panchayat election 2022 result) निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावं लागलं.
Nagar Panchayat Elections 2022 Result Live : नगरपंचायत, झेडपीचा रणसंग्राम; आज निकाल, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
कर्जत नगरपंचायतीत रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची बाजी
कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या (Karjat Nagar Panchayat Election) निकालात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे. राष्ट्रवादीनं 17 पैकी 12 जागा जिंकत एकहाती सत्ता काबिज केली आहे. राष्ट्रवादीनं 12, काँग्रेसनं 3 तर भाजपला केवळ दोन जागा जिंकता आल्या.
17 जागा असलेली कर्जत नगरपंचायतीत ओबीसी आरक्षणाच्या घोळामुळे 13 जागांवर मतदान 22 डिसेंबरला पार पडलं तर उर्वरीत 4 जागांसाठी काल मतदान झालं. गेल्या वेळी 13 जागांपैकी भाजपच्या एका उमेदवाराकडून ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने एक जागा बिनविरोध झाली होती तर भाजपच्या दुसऱ्या एका उमेदवाराने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने 11 जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. कर्जत नगरपंचायत निवडणुकीकडे (Karjat Nagar Panchayat Election) संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) व भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे (BJP Ram Shinde) या दोन नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
VIDEO - रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया