Sangli Nagar Panchayat Election Result 2022 : सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांसाठी काल (मंगळवारी) मतदान पार पडलं होतं. याचा आज निकाल जाहीर करण्यात आला. सांगलीतील काँटे की, टक्कर म्हणून पाहिली जाणारी कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणूक. या निवडणूकीत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. राष्ट्रवादीने कवठेमहांकाळ नगरपंचायत (kavathe mahankal nagar panchayat election 2022 result) निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला. रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावं लागलं. 


सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये भाजपने एकहाती सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे.  इथं 17 पैकी 10 जागांवर भाजपा, काँग्रेस जागांवर 6, तर राष्ट्रवादीला  1 जागावर समाधान मानावं लागलं आहे. तर सांगलीतील खानापूर नगरपंचायत निवडणुकीत कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या आघाडीला बहुमत मिळालं आहे. कॉंग्रेसचे सुहास शिंदे आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांची सरशी झाल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक आघाडीवर मात करत कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या आघाडीनं विजय मिळवला आहे. 


कवठेमहांकाळ नगरपंचात निकाल (kavathe mahankal nagar panchayat election 2022 result)



  • रोहित पाटील यांचे राष्ट्रवादी पॅनेल  10

  • शेतकरी विकास पॅनल 6 जागी विजयी

  • 1 अपक्ष विजयी


आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही : रोहित पाटील 


रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता. निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर. आर आबांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. रोहित पाटील यांची प्रचाराची भाषणं चांगलीच गाजली होती. रोहित पाटील यांनी जे बोलले होते, ते करुन दाखवल्याचं चित्र सांगलीतील कवठेमहांकाळमध्ये आहे. निकालानंतर माझा बाप आठवल्या शिवाय राहणार नाही, असं रोहित पाटील म्हणाले होते. आता निकालानंतर रोहित पाटील यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. रोहित पाटील म्हणाले, निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं, माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही" 


दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांसाठी काल (मंगळवारी) मतदान पार पडलं. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या 23 आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठीही मतदान पार पडलं. 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी काल सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरु झालं होतं. याशिवाय 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्त जागांसाठीही मतदान काल मतदान झालं. आज (बुधवार) निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :