एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पालघरमध्ये तांबाडी नदीच्या पुरात अडकलेल्या तरुणाला वाचवलं
![पालघरमध्ये तांबाडी नदीच्या पुरात अडकलेल्या तरुणाला वाचवलं Palghar One Stuck In Flood Of Tambadi River Latest Update पालघरमध्ये तांबाडी नदीच्या पुरात अडकलेल्या तरुणाला वाचवलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/02125141/palghar-boy-stuck-in-river.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या तांबाडी नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे. अंकुश पवार असं या 35 वर्षीय तरुणाचं नाव आहे. या तरुणाला बाहेर काढण्यासाठी विक्रमगडचे रहिवासी आटोकाट प्रयत्न करत होते.
रविवारी सकाळपासून पालघर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तांबाडी नदीला पूर आला. त्याच पाण्यात अंकुश अडकला होता.
पालघरमध्ये रात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे विक्रमगड तालुक्यातील 20 गावांचा संपर्क तुटला आहे. तर पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड तालुक्यातले नदी-नाले तुडुंब भरुन वाहत आहेत.
VIDEO : नदीच्या मधोमध अडकलेल्या तिघांच्या सुटकेचा थरार
गेल्या 48 तासांपासून देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली आहे. तसंच धरण क्षेत्रात चांगला पाऊस बरसत असल्यामुळे धरणांच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे पालघर तालुक्यातल्या धुकटण तसंच मनोरमध्ये घराची पडझड झाली आहे. त्यात घरातील सामान, महागड्या वस्तूंचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यानं अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे अनेक जण उघड्यावर पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)