एक्स्प्लोर

पालघर भूकंप : वसतिगृहातील विद्यार्थी रस्त्यावर

डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी आश्रमशाळेत सन 2010 साली केलेल्या बोअरवेलला पाणी येत नव्हतं. मात्र जेव्हापासून भूकंपाचे धक्के बसायला सुरुवात झाली तेव्हापासून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी यायला सुरुवात झाली आहे.

डहाणू (पालघर) : पालघरमधील भूकंपाच्या धक्क्यांनी निवासी वसतिगृहातील जवळपास 1200 विद्यार्थी रस्त्यावर आलेत. शिवाय स्थानिक प्रशासनानेही निर्णय घेऊन निवासी विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश दिले आहेत.  त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पालघरमध्ये बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांनी काही नैसर्गिक बदलही घडून आले आहेत. डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी आश्रमशाळेत सन 2010 साली केलेल्या बोअरवेलला पाणी येत नव्हतं. मात्र जेव्हापासून भूकंपाचे धक्के बसायला सुरुवात झाली तेव्हापासून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी यायला सुरुवात झाली आहे. पालघर भूकंप : एनडीआरएफची दोन पथकं पोहोचली, नागरिकांमध्ये जनजागृती करणार पालघर जिल्ह्यात भूकंपाचं सत्र सुरुच आहे. काल दिवसभरात भूकंपाच्या 5 धक्क्यांनी पालघर जिल्हा हादरला. भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरुन घरातून धावत बाहेर पडणाऱ्या चिमुरडीचा मृत्यू झाला. वारंवार होत असलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमिवर पिंपरी चिंचवडच्या सुदुंबरे येथून एनडीआरएफची दोन पथकं पालघरमध्ये पोहोचली आहेत. भीतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांना भूकंपानंतरच्या परिस्थितीला कसं सामोरं जावं याचं प्रात्यक्षिक एनडीआरएफकडून देण्यात येणार आहे. एनडीआरएफने सोबत 200 टेंट आणि आपत्ती व्यवस्थापनाची सर्व साधनं आणली आहेत. काल झालेली भूकंपाच्या धक्क्यांनंतर बरेचशी कुटुंबं भीतीच्या सावटाखाली आहेत. ती घरात राहायला तयार नाहीत. त्या कुटुंबांना टेंटमध्ये राहण्याची सोय एनडीआरएफकडून केली जात आहे. तसेच 40 जवानांच्या दोन तुकड्या विभागून नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहेत. मोठा भूकंप झालाच तर न घाबरता त्याला कसं सामोरं जावं याचं प्रात्यक्षिक दिलं जाणार आहे. पालघर भूकंप : आरोग्य विभागासह एनडीआरएफला पाचारण पालघर जिल्ह्यात काल दिवसभरात एकामागोमाग एक भूकंपाच्या 6 धक्क्यांनी हादरलं आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. हे धक्के 4.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे असल्यानं पालघरवासियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  त्यातच भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरुन घरातून धावत बाहेर पडणाऱ्या एका चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान एकामागोमाग एक धक्के बसत असल्यानं प्रशासनामार्फतही दक्षता घेण्यात येत आहे. कच्च्या बांधकामाची घर असलेल्यांना रात्री घराबाहेरच झोपण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. भुंकपाच्या धक्क्यांमुळे लोकांच्या घरांची पडझड होत असून शाळांच्या भिंतींना तडे पडले आहेत. त्यामुळे सततच्या धक्क्यांमुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, चिमुकलीचा मृत्यू भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरुन घरातून धावत बाहेर पडणाऱ्या चिमुरडीचा मृत्यू झाला. वारंवार होत असलेल्या भूकंपामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पालघरला काल सकाळी 7 वाजता भूकंपाने पहिला तडाखा दिला. सर्व शांत होत नाही तोवर जमीन पुन्हा हादरली. या भूकंपाने पालघरकरांना अक्षरश: रस्त्यावर आणलं. लोक दुकान, घरं सोडून रस्त्यावर आले. इतकचं काय शाळेवतील विद्यार्थीही जीव मुठीत घेऊन मैदानात दाखल झाले. पालघरला भूकंपाचे धक्के काही नवीन नाहीत. मात्र एकाच दिवसात लागोपाठच्या धक्क्यांनी मात्र कहर केला. घरांच्या भिंतीना पडलेल्या भेगांनी भूकंपाची तीव्रता दाखवली. लागोपाठच्या धक्क्यांनी भेदरलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा शाळेत जायची हिंम्मत होत नाही. पालघरमध्ये भूकंपाची वारंवारता, तीव्रता आणि व्यापकता ही दिवसागणिक वाढत आहे. हे वाढते धक्के मोठ्या भुकंपाची चाहूलही असू शकतात. मात्र तीन भूकंप मापन करणाऱ्या यंत्रांशिवाय सरकारने काय उपायोजना केल्या हा प्रश्न जनतेला पडला आहे. तलासरी आणि डहाणू तालुके गेल्या तीन महिन्यापासून भूकंपाच्या धक्क्याने हादरत आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भीतीने नागरिकांना रात्री-अपरात्री घराबाहेर अंगणात उघड्यावर झोपावे लागत आहे. आतापर्यंत 14 पेक्षा जास्त वेळा भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. पालघरमधील भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम - 11 नोव्हेंबर - 3.2 रिश्टर स्केल - 24 नोव्हेंबर - 3.3 रिश्टर स्केल - 1 डिसेंबर - 3.1 आणि 2.9 रिश्टर स्केल - 4 डिसेंबर - 3.2 रिश्टर स्केल - 7 डिसेंबर - 2.9 रिश्टर स्केल - 10 डिसेंबर - 2.8 व 2.7 रिश्टर स्केल - 20 जानेवारी - 3.6 रिश्टर स्केल - 24 जानेवारी - 3.4 रिश्टर स्केल - 1 फेब्रुवारी - 3.3, 3.5, 3.0, 4.1 रिश्टर स्केल संबंधित बातम्या पालघर भूकंप : एनडीआरएफची दोन पथकं पोहोचली, नागरिकांमध्ये जनजागृती करणार पालघर भूकंप : आरोग्य विभागासह एनडीआरएफला पाचारण पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, चिमुकलीचा मृत्यू

VIDEO | पालघर जिल्ह्यात भूकंपाचे दिवसभरात पाच धक्के! | एबीपी माझा

पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिक भयभीत

भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर जिल्हा जेरीस, नागरिक धास्तावले

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget