एक्स्प्लोर

पंतप्रधान पीक विमा योजना राफेलपेक्षाही मोठा घोटाळा : पी साईनाथ

पहिल्या दोनच वर्षात विमा घेणाऱ्या कंपन्यांनी या योजनेतून 15,795 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला. त्यामुळे पीक विमा योजना हा राफेलपेक्षाही मोठा घोटाळा असल्याचा घणाघात पी. साईनाथ यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत केला.

बीड : कथित राफेल विमान घोटाळ्यापेक्षा पंतप्रधान पीक विमा योजनेतून मोठा घोटाळा झाला, असा दावा ज्येष्ठ पत्रकार आणि कृषीतज्ज्ञ पी. साईनाथ यांनी केला. राफेल विमानाची एकूण खरेदी किंमत 58 हजार कोटी रुपये सांगितली जाते. मात्र गेल्या तीन वर्षात पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये एकूण 68 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. म्हणजेच राफेलच्या कथित किमतीपेक्षा दहा हजार कोटी रुपयांनी जास्त. पहिल्या दोनच वर्षात विमा घेणाऱ्या कंपन्यांनी या योजनेतून 15,795 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला. त्यामुळे पीक विमा योजना हा राफेलपेक्षाही मोठा घोटाळा असल्याचा घणाघात पी. साईनाथ यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत केला. राफेल विमानाची खरेदी ही फक्त एकाच वेळी झाली. मात्र पंतप्रधान पीक विमा योजनेत दरवर्षी 20 ते 22 हजार कोटी रुपयांचा फायदा हा विमा कंपन्यांना होतो. 2016 साली केंद्र आणि राज्य सरकारला प्रत्येकी दहा-दहा हजार असे एकूण 20 हजार, 2017 मध्ये 22 हजार आणि 2018 मध्ये 26 हजार अशी चक्रवाढ दराने रक्कम मिळत गेली. ही स्कीमच स्कॅम आहे, अशा शब्दात पी साईनाथ यांनी टीका केली. स्वामिनाथन आयोगातर्फे कृषी विकासाचा अहवाल सादर करुन आज 14 वर्षे झाली, पण इतक्या वर्षात एकाही सरकारने यावर सलग एक तास संसदेमध्ये चर्चासुद्धा केली नाही. देशात शेतकरी आत्महत्या वाढल्या असून सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. मात्र शेतकरी आत्महत्यांची आकडेवारीही आता सरकारने देणं बंद केलं आहे. सरकार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आकडेवारी जाणीवपूर्वक लपवत असल्याचा आरोपही पी. साईनाथ यांनी केला. कर्जमाफी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं अंतिम उत्तर नाही. शेतीचे प्रश्‍न समजून घ्यायचे असतील, ते सोडवायचे असतील तर स्वामीनाथन आयोग पीक विमा योजना, शेतकरी आत्महत्या या विषयावर चर्चा करण्यासाठी किमान तीन आठवड्यांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget