एक्स्प्लोर

8 रुपयाचं चिरडी वस्त्र 3 हजारात, तुळजाभवानीच्या दारात भक्तीचा बाजार

देवीला अर्पण करण्यासाठी वापरलं जाणार 8 रुपयांच्या चिरडी वस्त्राला अडीच ते तीन हजार रुपयाचं महावस्त्र बनवून भाविकांच्या माथी मारलं जात आहे.

उस्मानाबादमहाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मातेच्या दारात भक्तीचा बाजार मांडल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. भवानी रोड, महाद्वार रोड आणि कामे गल्लीत असलेल्या काही दुकानांमधून भाविकांची फसवणूक सुरु असल्याचं उजेडात आलं आहे. देवीला अर्पण करण्यासाठी वापरलं जाणार 8 रुपयांच्या चिरडी वस्त्राला अडीच ते तीन हजार रुपयाचं महावस्त्र बनवून भाविकांच्या माथी मारलं जात आहे. फसवणुकीचा हा प्रकार तुळजापुरातील सजग नागरिक विजय भोसले यांनी एबीपी माझाच्या निदर्शनास आणून दिला. एका साडीचे दोन ते तीन तुकडे करुन त्याचं तथाकथित महावस्त्र बनवून ते भाविकांच्या माथी मारलं जात आहे. त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेची अशा प्रकारची विटंबना कशी थांबणार, हा प्रश्न आता विचारला जात आहे. विजय भोसलेंनी हे लक्षात आणून दिलं की एका साडीचे दीड ते दोन फुटाचे तुकडे तयार केले जातात. या तुकड्यांना दुकानदारांच्या भाषेत चिरडी असं म्हणतात. या तुकड्यांच्या आत हिरवा कागद आणि रद्दी भरली जाते.  त्यामुळे चिर्डीचा आकार बदलून ते साडी सारखा होतो. हेच वस्त्र महावस्त्र म्हणून तीन हजार रुपयांपर्यंत भाविकांच्या माथी मारला जाते. भाविक ते वस्त्र घेऊन मंदिरात पूजेला जातात. भाविकांच्या भावनेशी खेळ करुन अर्धवस्त्र चढवणे खरं म्हणजे श्रद्धेची विटंबना आहे. परंतु नाइलाजाने पुजाऱ्यांना हे वस्त्र अर्पण करावं लागतं. त्यातून पुजारी आणि भाविक असे काही वादाचे प्रसंगही होत आहेत. यासंदर्भात विजय भोसलेंनी राज्य सरकारच्या ताब्यात असलेल्या मंदिर प्रशासनाला 14 मार्चला निवेदन दिलं. त्यावर मंदिर प्रशासनाने हा आपला विषय नसल्याचे सांगत हात वर केले. तुळजापुरात भाविक दाखल होताच सर्व धर्मस्थळात जसा भाविकांना दुकानदारांचा गराडा पडतो, तसंच इथंही होतं. आता भाविकांच्या लक्षात ही फसवणूक येऊ लागली आहे. परंतु त्यांना हे माहीत नाही की दाद कुणाकडे मागायची.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आता पंढरीत विठ्ठल नाही! तुमच्या बलिदान स्थळी हा शेवटचा पत्रव्यवहार, अमोल मिटकरीचं अजितदादांना भावनिक पत्र
आता पंढरीत विठ्ठल नाही! तुमच्या बलिदान स्थळी हा शेवटचा पत्रव्यवहार, अमोल मिटकरीचं अजितदादांना भावनिक पत्र
भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा, राष्ट्र प्रथम मंत्रासह विस्तार, रविंद्र चव्हाणांकडून गौरवशाली प्रवासाचा आढावा
भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा, राष्ट्र प्रथम मंत्रासह विस्तार, रविंद्र चव्हाणांकडून गौरवशाली प्रवासाचा आढावा
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
दिल्ली विधानसभा बॅरिकेड तोडून कार घुसली; व्हीआयपी गेटमधून आत शिरून, चालकाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाजवळ पुष्पगुच्छ ठेवला अन् पळ काढला!
दिल्ली विधानसभा बॅरिकेड तोडून कार घुसली; व्हीआयपी गेटमधून आत शिरून, चालकाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाजवळ पुष्पगुच्छ ठेवला अन् पळ काढला!
Embed widget