एक्स्प्लोर
Advertisement
अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, पोलिस उपनिरीक्षकाला 10 वर्ष शिक्षा
पोलिसांनी जलद गतीने तपास केल्याने आरोपीला 14 महिन्यात शिक्षा ठोठावण्यात आली.
उस्मानाबाद : अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी उस्मानाबादेत पोलिस उपनिरीक्षकाला 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरोपी प्रेमकुमार बनसोडेला शिक्षेसोबतच एक लाख 5 हजार रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे.
6 ऑगस्ट 2016 रोजी उस्मानाबाद शहरात गुन्हा घडला होता. पोलिसांनी जलद गतीने तपास केल्याने आरोपीला 14 महिन्यात शिक्षा ठोठावण्यात आली. उस्मानाबाद सत्र न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.
विशेष म्हणजे आरोपी हा पोलिस खात्यातील अधिकारी असतानाही पोलिसांनी वेगाने तपास करुन पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. राज्य शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून पी. वाय. जाधव यांची नियुक्ती केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement