एक्स्प्लोर
Advertisement
ना इंधनाची गरज, ना परमिटची, ई-रिक्षाला ग्राहकांची पसंती
स्वस्त आणि मस्त असणारी ही रिक्षा बॅटरीवर चालते. सहा तास चार्ज करा आणि 100 किलोमीटर अंतर फिरा
उस्मानाबाद : ई-रिक्षा... ना इंधनाची गरज... ना कोणत्याही परमिटची.... प्रदूषणही होत नाही आणि कसला आवाजही येत नाही... उस्मानाबादच्या रस्त्यांवर सध्या ई रिक्षा फिरताना दिसत आहेत.
स्वस्त आणि मस्त असणारी ही रिक्षा बॅटरीवर चालते. सहा तास चार्ज करा आणि 100 किलोमीटर अंतर फिरा. सेंटर लॉक... उत्तम हेडलाईट... प्रवाशांसाठी कम्फर्ट आणि अद्ययावत म्युजिक सिस्टिम अशा सुविधांनी ही रिक्षा सज्ज आहे.
या रिक्षाच्या कुठल्याही भागाला कधीही गंज पकडणार नाही अशी गॅरंटी देण्यात आली आहे. शिवाय पैशांचीही बचत होत असल्यामुळे ग्राहकांना रिक्षा आवडू लागली आहे.
अशा या हायटेक रिक्षांना ग्राहक उत्तम पसंती देत आहेत. त्यामुळे पर्यावरणाशी मैत्री करणाऱ्या या रिक्षा महाराष्ट्रभर नाही तर सबंध भारतभर फिरायला हव्यात, अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement