Maharashtra Corona Update : दिलासा...! राज्यात आज 52,898 रुग्ण बरे होऊन घरी तर 28, 439 नवीन रुग्णांचे निदान

Maharashtra Corona Update : दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 52,898 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 28, 438 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

Continues below advertisement

 मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 52,898 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर  28,438 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  आजपर्यंत एकूण 49, 27, 480 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.  यामुळं  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 90.69% एवढे झाले आहे.

Continues below advertisement

राज्यात आज 679 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.54% एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,15, 88, 717 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,33, 506 (17.2 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 30, 97, 161 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,004 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात आज एकूण 4,19,727 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  


मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज पुन्हा घट 

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज पुन्हा घट झाली आहे. मुंबईत आज 953 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2258 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सध्या मुंबईत 32 हजार 925 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत काल 1657 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2572 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला . मुंबईचा डबलिंग रेट हा आता 255 दिवसांवर गेला आहे. तर बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर गेले आहे.  

पुण्यात  नव्या रुग्णसंख्येत होणारी घट कायम  

पुणे शहरात आज नव्याने 1 हजार o21 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात शहरातील 2 हजार 892 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 36 हजार 690 झाली आहे. 

संबंधित बातम्या :

भारतीयांसाठी असलेल्या लसी निर्यात केल्या नाहीत, सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण

Covaxin Clinical Trail : 'कोवॅक्सिन'च्या 2 ते 18 वर्ष वयोगटातील फेज दोन आणि तीनच्या क्लिनिकल ट्रायलला 10 -12 दिवसात सुरुवात

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola