Ajit Pawar : शेतकऱ्यांनी नवं वर्ष साजरं कसं करायचं? नुकसानीच्या पंचनामाम्यावरुन अजित पवार संतापले
Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीच्या मुद्यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
Ajit Pawar : अवकाळी पावसामुळं (unseasonal rains) आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकार आम्हाला सांगतंय पंचनामे करु, पण अद्यापही पंचनामे होत नसल्याचे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. आता नवीन वर्ष सुरु होतं आहे. शेतकऱ्यांनी नवीन वर्ष कसं साजरं करायचं? असा सवाल अजित पवारांनी राज्य सरकारला केला.
राज्यात परिस्थिती गंभीर, सरकार मात्र ठोस भूमिका नाही
शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मुद्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याचे अजित पवार म्हणाले. अनेक ठिकाणी दगडासारख्या गारा पडल्या आहेत. यामुळं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ सांगितले पाहिजे की पंचनामे करुन त्यावर सही करा. सही झाल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही असे अजित पवार म्हणाले. राज्यात परिस्थिती गंभीर झाली आहे. सरकार मात्र ठोस भूमिका घेत नसल्याचे अजित पवार म्हणाले. यानंतर विपरोधकांनी शेती प्रश्नावरुन सभात्याग केला.
पाहा व्हिडीओ : Maharashtra Session : अवकाळी पावसाचा मुद्दा सभागृहात पेटला, विरोधकांचा सभा त्याग
आज आणि उद्यापर्यंत पंचनामे पूर्ण होतील : राधाकृष्ण विखे पाटील
दरम्यान, अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले. आज आणि उद्यापर्यंत पंचनामे पूर्ण होतील असे अजित पवार म्हणाले.
शासकीय कार्यक्रमाला कर्मचारी हजर, मग नुकसानीचे पंचनामे करायला का नाही?
सरकारी कर्मचारी संपावर असल्यामुळं पंचनामे होत नाहीत असं राज्य सरकार सांगत आहे. पण राज्यात शासनाचे सगळे कार्यक्रम सुरु आहेत. त्या सर्व कार्यक्रमांना कर्मचारी हजर राहत असल्याचे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनिल केदार म्हणाले. शासकीय कार्यक्रमाला कर्मचारी हजर राहतात मग शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करायला कर्मचारी का हजर राहत नाहीत असा सवाल सुनिल केदार यांनी केला. ही शासनाची दुटप्पी भूमिका असल्याचे केदार म्हणाले.
तारतम्य बाळगावं, संजय गायकवाडांच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया
सध्या सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडं हरामीची कमाई आहे, असे वादग्रस्त वक्तव्य या सरकारच्या लोकांकडून केलं जात असल्याचे अजित पवार म्हणाले. काही बोलायचं असेल तर तारतम्य बाळगलं पाहिजे. तुम्हीही काहीही बोलता, असे म्हणत आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :