एक्स्प्लोर

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, 12 कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र; देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर निशाणा

राज्यात 15 लाख लोक राज्यात कोरोनाग्रस्त आहेत. राज्यात फक्त एकच धंदा सुरुय तो म्हणजे बदल्यांचा धंदा. प्रेताच्या टाळूवरचं लोणी राज्यकर्ता खात आहेत. कोरोनाचा बाजार केला आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश भाजपची कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. या बैठकीत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर महिलांवरील अत्याचार, मराठा आरक्षण, कृषी कायदे अशा विविध मुद्द्यांवरुन चौफेर टीका केली. जनतेला उत्तरदायित्व असलेला भाजप एकमेव पक्ष आहे. कोरोना संकटात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर आहे, एकही घरी बसलेला नाही असा अप्रत्यक्ष टोला देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. या मंत्र्यांना झोप कशी लागते. 15 लाख लोक राज्यात कोरोनाग्रस्त आहेत. राज्यात फक्त एकच धंदा सुरुय तो म्हणजे बदल्यांचा धंदा. प्रेताच्या टाळूवरचं लोणी राज्यकर्ता खात आहेत. कोरोनाचा बाजार केला आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला

राज्यकर्त्यांना ठणकावून सांगतो, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. 12 कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे. रोज महिलांवरच्या बलात्कार आणि अत्याचारामुळे महाराष्ट्राची बदनामी होतेय. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. कुणी बाहेरून येऊन आमच्या महाराष्ट्राला बदनाम करू शकत नाही. हाथरसच्या घटनेचा निषेध केलाच पाहिजे. मात्र राज्य, जात, समाज, राजकीय व्यवस्था पाहून रस्त्यावर उतरून विरोध म्हणजे बेगडीपणा आहे. राजस्थानमधल्या दलित मुलीबद्दल का नाही केलं आंदोलन, का नाही केलं ट्वीट? असा सवाल फडणवीस यांनी विचारला. फेब्रुवारीत सात महिलांवर अत्याचार झाले तेव्हा का नाही केले आंदोलन? क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला सुरक्षित नसतील तर कुठे सुरक्षित असणार? आमच्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी हाथरसला जाऊन संवेदना व्यक्त केली. पण तेच मंत्री त्यांच्या बाजूला हिंगणघाटला का नाही गेले? किती महिलांचा विनयभंग झाल्यावर तुम्ही SOP करणार आहात? मुख्यमंत्री, गृहमंत्री या तुमच्या मुली नाहीत का? आमच्या पत्राला उत्तर देऊ नका पण कृतीतून तरी उत्तर द्या, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही, असं दिसतंय

या सरकारमध्ये समन्वय नाही. कोणी काही बोलतंय, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठा संताप आहे. केस दाखल केली नाही, म्हणून बेंचसमोर प्रकरण जाऊ शकत नाही आणि स्थगिती उठणार नाही. कधीकधी मला यांच्या मनातच काळंबेरं आहे, असं वाटतं. कारण यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही असं दिसतंय. भाजपने केलेला कायदा वैध नसता तर हायकोर्टात मान्य झालाच कसा? यांच्या नाकर्तेपणाचा ठपका भाजपच्या माथी मारण्याचे काम ते करत आहेत.

मराठा आणि ओबीसी समाजाला आमने सामने आणण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही भाजपची भूमिका आहे. मी स्वतः भोगलं आहे. महाराष्ट्र जळतो तेव्हा सरकार नाही सामान्य माणूस जळतो. आम्हाला हे उद्रेक नको आहेत. सनदशील मार्गाने आंदोलनं करा. आम्ही हा तिढा सोडवण्यासाठी सरकारसोबत आहोत. विरोधासाठी विरोध करणारा आम्ही विरोधी पक्ष नाही तर समाजाच्या हितासाठी लढणारा विरोधी पक्ष आहोत.

एमपीएससीची परीक्षा झाली पाहिजे की नाही यावर मार्ग काढणं हे सरकारचं काम आहे. झुलवत ठेवणं हे सरकारचं काम नाही. इथे कोणी बसायला, चर्चा करायलाच तयार नाही. हे सरकार नेमकं चालवतय कोण हेच कळत नाही. आंदोलनं करत राहा, आम्ही पोलिसांच्या माध्यमातून आंदोलनं चिरडू असा पवित्रा सरकारचा आहे. राज्य सरकारने विधिमंडळाच्या अधिकारांचा वापर करून मार्ग काढायचा असतो.

कृषी विधेयकावरून फडणवीस यांचा शरद पवारांवर निशाणा

शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगती' या त्यांच्या पुस्तकात शेतीमाल कुठेही विकण्यावर बंदी नको. तसेच एपीएमसी मोडीत काढायला हव्या. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे असे मत व्यक्त केले आहे. तसेच शरद पवारांनी कृषी विधेयकाला कुठेच जाहीर विरोध केलेला नाही. त्यांनी फक्त राज्यसभेतील खासदारांच्या निलंबनाची निंदा केली. मात्र वरून 'मॅडम'चा आदेश आल्यानंतर विरोध करण्यास भाग पडत आहेत. त्यामुळे उद्धवजींनाही त्यावर विरोध करण्यास भाग पाडले. हे सगळे बेगडी आहेत, अशी टीका त्यांनी केली.

शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी संघर्षाची वेळ आली तरी करू. काल पर्यटन विभागाने नोटीस काढली आणि बारची वेळ वाढवली. मंदिर नाही पण मदिरालयाची वेळ वाढवलीय. मंदिरात कोरोना होतो, मदिरालयात कोरोना होत नाही. उद्धव साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. देव, देश आणि धर्माची लढाई आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवली पण तुम्ही बदललात उद्धव जी. या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? सरकारला वठणीवर आणणए आम्हाला येतं, रस्त्यावर उतरून तुम्हाला वठणीवर आणू, असा इशाला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला

शिवसेनेने कोकणाला भरभरून दिले, पण कोकणाला या सरकारने काय दिलं? विदर्भाला फक्त 16 कोटी रुपये दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले आहे पण सरकार दिसतंय कुठे? पिकेल ते विकेल काय करता? मागच्या वर्षी पिकलं ते खरेदी केलं नाही आणि काय वल्गना करता? आम्ही सत्तेत असताना प्रोफेशनल शेतकरी नेते रस्त्यावर उतरत होते ते आता कुठे गायब झालेत?  लबाडी काय असते हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसकडून शिकावं, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
अकोला शिक्षक मतदारसंघ निवडणूक! मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मतदान मात्र, आमच्या उमेदवाराला करा, ठाकरेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
अकोला शिक्षक मतदारसंघ निवडणूक! मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मतदान मात्र, आमच्या उमेदवाराला करा, ठाकरेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Embed widget