एक्स्प्लोर
कांदा रडवणार! किरकोळ बाजारात दर साठीपार
कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरीही आपल्या चाळीतील कांदा कमी प्रमाणात विक्रीला काढतं आहे.
नवी मुंबई : किरकोळ बाजारात कांद्याने साठी गाठल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात कांद्याची आवक 40 टक्क्यांनी घटल्याने कांद्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
एपीएमसी बाजारात दररोज सरासरी शंभर ते सव्वाशे गाड्यांची आवक बाजारात होत होती. आता मात्र हीच आवक 75 गाड्यांवर आली आहे. यामुळे कांद्याचे दर चांगलेच कडाडले आहेत. घाऊक बाजारात 40 रुपयांनी कांदा विकला जात आहे. तर हाच कांदा मुंबईच्या किरकोळ बाजारपेठेत 60 रुपयांहून अधिक दराने कांदा विकला जातोय.
कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरीही आपल्या चाळीतील कांदा कमी प्रमाणात विक्रीला काढतं आहे. दिवाळी नंतर मात्र कांद्याचे भाव स्थिरावतील असा अंदाज आहे. मात्र कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी मात्र आनंदीत आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा धक्का | नवी दिल्ली | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement