एक्स्प्लोर

माझा इम्पॅक्ट: नागपूरमधील पोहे प्रकरणी एक पोलिस निलंबित, तिघांची बदली

नागपूर: नागपूरमधील पोहेप्रकरणी 1 पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. तर तीन पोलिस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, पीडित मुलाच्या तक्रारीवर अजूनही खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.   फुकट पोहे खाऊन ठेलेवाल्याकडूनच 9 हजार रुपये वसूल करणाऱ्या पोलिसाचा पर्दाफाश ‘एबीपी माझा’ने केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशीनंतर सुनील मस्के या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. तसंच अजय थूल, गजानन निशिथकर, अंकुश घाटी या तिघांची सीताबर्डी पोलीस ठाण्यातून नागपूर पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.   काय आहे प्रकरण?   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 15 दिवसांपूर्वी तुली इंटरनॅशनल परिसरात कार्यक्रम होता. त्यासाठी पोलीस रामदास पेठ परिसरात बंदोबस्ताला होते. बराच उशीर झाल्यानं त्यांना भूक लागली आणि त्यांनी ठेला गाठला. एका मुलाच्या ठेल्यावर पोहे आणि चहाचा नाश्ता केल्यावर बिल झालं 105 रुपये. ते या मुलानं वसूलही केलं, पण त्याची शिक्षा त्याला रविवारी मिळाली.   रविवारी मुलाला पोलिसांनी पकडून नेलं. हे ऐकताच त्याचे काका घाबरले. त्यांनी पोलीस ठाणं गाठलं, तर फुकट्या पोलिसांचा पारा चढलेला. फक्त पोह्याचे 105 रुपये घेतले, म्हणून सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडून 9 हजार रुपये वसूल केले.   या मुलाची परिस्थिती गरीबीची आहे. घरात खाणारी तोंडं जास्त. त्यामुळे दिवसभर पोह्याचा ठेला चालवायचा, आणि रात्रशाळेत शिकायचं, असा त्याचा दिनक्रम. एवढे कष्ट करुन त्याच्या नशीबी आली ती पोलिसांची मुजोरी.   पोलिसांनी अडल्या-नडलेल्यांना मदत करणं अपेक्षित आहे, इथं पोलीस फुकटेगिरीत, हप्तेखोरीत आणि खंडणीखोरीत दंग आहेत. त्यामुळे पुन्हा अशी घटना होऊ नये, असं वाटत असेल तर सीताबर्डी पोलिसांवर खंडणीखोरीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.   संबंधित बातम्या:

माझा इम्पॅक्ट : फुकटात पोहे खाणाऱ्या पोलिसाची चौकशी

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar Protest : रोहित पवारांच्या आंदोलनाला विरोध नाही, पण पक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेऊन लढल्यास...; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट 
रोहित पवारांच्या आंदोलनाला विरोध नाही, पण पक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेऊन लढल्यास...; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट 
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार

व्हिडीओ

Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Maharashtra Government Doctors Demands : सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
Embed widget