एक्स्प्लोर
पालघरमध्ये 21 वर्षीय गोविंदाचा थरावरुन पडून जागीच मृत्यू
पालघरमध्ये दहीहंडीच्या थरावरुन पडून 21 वर्षीय गोविंदाचा जागीच मृत्यू झाला आहे. धनसार काशीपाडा येथील रोहन गोपीनाथ किणी 21 वर्षीय गोविंदाचा दुर्दैवी अंत झाला.

पालघर : पालघरमध्ये दहीहंडीच्या थरावरुन पडून 21 वर्षीय गोविंदाचा जागीच मृत्यू झाला आहे. धनसार काशीपाडा येथील रोहन गोपीनाथ किणी या 21 वर्षीय गोविंदाचा दुर्दैवी अंत झाला. दहीहंडीचा सर्वत्र जल्लोष साजरा केला जात असताना पालघर तालुक्यातील धनसारमध्ये उत्सवाला गालबोट लागलं आहे. रोहन गोपीनाथ किणी हा 21 वर्षीय तरुण दहीहंडी फोडताना वरच्या थरावरून खाली पडून जखमी झाला. त्याला तातडीने पालघरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रोहन वरच्या थरावरून दहीहंडी फोडत असताना त्याला फिट आल्याने तो खाली कोसळला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करीत आहेत.
Before You Go
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















