Winter Assembly Session Maharashtra : महाराष्ट्रात आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट घोंघावत आहे. अधिवेशनाआधी करण्यात आलेल्या RTPCR टेस्टमध्ये 10 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आठ पोलीस कर्मचारी आणि इतर दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सत्र सुरू होण्यापूर्वी सुमारे 3500 लोकांची चाचणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगबाबत निर्णय घेणे बाकी आहे. मंगळवारी, महाराष्ट्रात कोरोनाचे 825 नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये ओमायक्रॉनच्या 11 रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या RTPCR चाचणीत आठ पोलिसांसह 10 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या लोकांपैकी दोघे विधिमंडळाचे कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगबाबत निर्णय घेणे बाकी आहे.

राज्यातील एकूण बाधितांची संख्या 66 लाख 50 हजार 965आरोग्य विभागाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 66 लाख 50 हजार 965 झाली आहे. तर मृतांचा आकडा एक लाख 41 हजार 367 वर पोहोचला आहे. सोमवारी, राज्यात कोरोना संसर्गाची 544 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. परंतु ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही. याशिवाय चार रुग्णांचा मृत्यू झाला होता.

राज्यात ओमायक्रॉनचे 65 रुग्णराज्यात मंगळवारी ओमायक्रॉन व्हेरियंटचे नवी रुग्ण सापडले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्यांची एकूण संख्या 65 झाली आहे. आरोग्य विभागाने सांगितले की, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या अहवालानुसार, राज्यात आणखी 11 जणांना कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराची लागण झाली आहे. मुंबई विमानतळावर तपासणीदरम्यान आठ जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले. तर नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि उस्मानाबाद येथे प्रत्येकी एका व्यक्तीला कोरोनाच्या ओमायक्रॉनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha