Curly Hair Care Tips : हिवाळ्यात आपल्याला आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते, त्याचप्रमाणे चेहरा आणि केसांचीही काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात थंडीमुळे केस रुक्ष आणि कोरडे होतात. अशातच जर तुमचे केस कुरळे असतील तर तुम्हांला अधिक त्रासाला सामोरे जावे लागते. कुरळे केस जाड आणि कोरडे झाल्याने तुटण्याची शक्यता असते. अशा वेळी केसांना योग्य पोषण आणि उपायांची गरज असते. जाणून घ्या कशी घ्याल कुरळ्या केसांची काळजी.


कुरळे केस म्हणजे एक स्टाईल स्टेटमेंट बनली आहे. मात्र, त्यांची योग्य काळजी घेतली नाही तर, ते तितकेच खराब होण्याची शक्यता असते. 


अशी घ्याल कुरळ्या केसांची काळजी
1. वारंवार केस विंचरू नये.
कुरळे केस आधीच कोरडे असतात. त्यात हिवाळ्यात ते अधिक रुक्ष होतात. अशावेळी तुमचे केस तुटण्याची जास्त भीती असते. जितके तुम्ही केसांचा गुंता काढण्याचा प्रयत्न करताना केसांना ओढता किंवा ताणता तितका गुंता वाढत जाईल. त्यामुळे कुरळे केस वारंवार विंचरू नयेत. असे केल्याने तुमच्या केसांचे घर्षण होऊन केस तुटणार नाहीत.


2. सिल्कच्या उशीचे कव्हर वापरा.
कुरळ्या केसांची ओढाताण किंवा घर्षण झाल्ये केस तुटण्याची भीती असते. त्यामुळे झोपताना तुम्ही सिल्कचा किंवा मऊ उशीचे कव्हर वापरून झोपा. कारण इतर कपड्याचे उशीचे कव्हर वापरून झोपल्यास तुमचे केस तुटण्याची शक्यता असते. कुरळे केस आधीच कोरडे आणि नाजूक झालेले असतात. परिणामी अधिक त्रास होऊ शकतो. 


3. तेल लावणे.
हिवाळ्यात कुरळे केस कोरडे होतात. त्यामुळे त्याला योग्य पोषण मिळण्याची आवश्यकता असते. त्यामुळे  खोबरेल तेल, बदाम तेल किंवा तुमच्या आवडीचे इतर कोणतेही तेल कोमट करुन त्याने केसांची मालिश करावी. तेल केसांवर किमान 1 तास तसेच राहू द्यावे. तुम्ही तेल रात्रभरही केसांवर तेल तसेच ठेवून झोपू शकता. त्यानंतर सकाळी उठून केस धुवा. 


4. बाहेर जाताना केस झाका.
थंडीत बाहेरील पडताना केस झाकण्यासाठी स्कार्फ किंवा मऊ कपड्याचा वापर करा. हिवाळ्यामध्ये ज्याप्रमाणे थंड हवेमुळे त्वचा कोरडी पडते, त्याचप्रमाणे केसही अधिक कोरडे पडतात. शिवाय, धुळीचे कण केसांमध्ये जाऊन केस खराब होतात. त्यामुळे हिवाळ्यात बाहेर पडताना केस कव्हर करा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha