20 फेब्रुवारीपासून पुण्यातील ओला, उबरची सेवा बंद राहणार, नेमका का घेतला निर्णय?
येत्या 20 फेब्रुवारीपासून पुण्यातील ओला, उबरची सेवा (Ola Uber services) बंद राहणार आहे.
Pune News : येत्या 20 फेब्रुवारीपासून पुण्यातील ओला, उबरची सेवा (Ola Uber services) बंद राहणार आहे. या निर्णयामुळं पुण्यातील (Pune) प्रवशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. 20 फेब्रुवारीपासून पुणे आणि चिंचवडमधील कॅब चालकांचे काम बंद आंदोलन सुरु होणार आहे. कॅब चालकांकडून पुणे येथील आरटीओ ऑफिस येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले दर लागू करण्यास कंपन्या टाळाटाळ करत असल्याचा चालकांचा आरोप आहे. त्यामुळं येत्या 20 फेब्रुवारीपासून RTO पुणे येथे तीव्र निदर्शने व बेमुदत बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
आंदोलनात सुमारे 20 हजार कॅब चालक सहभागी होणार
प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी कॅब कंपन्यांसाठी दर पत्रक जाहीर केले. 1 जानेवारी 2024 पासून नवीन दर लागू झालेत. मात्र, ओला, उबेर यासारख्या कंपन्या प्रत्यक्षात त्या दराची अद्याप अंमलबजावणी करत नाही. परिणामी याचा फटका कॅब चालकांना बसत आहे. नवीन दर लागू झाल्यास कॅब चालकांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ होईल, आणि वाढीव दराचा व्यवसायावर परिणाम होईल. या भीतीने कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांनी अद्याप दराची अंमलबजावणी करत नाही. त्यामुळं 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संगम ब्रिज जवळ आरटीओ कार्यालयासमोर कॅब चालक एकत्रित येतील, अन् निदर्शने करणार आहेत. या आंदोलनात सुमारे 20 हजार कॅब चालक सहभागी होणार असल्याचा दावा डॉ. केशव क्षीरसागर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या: