एक्स्प्लोर
एनआरआय भक्ताकडून शिर्डीच्या साईचरणी 17 लाखांचं दान
शिर्डी : शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भक्तांकडून कोट्यवधी रुपयांचं दान दिलं जात असतं. अमेरिकेत राहणाऱ्या एका एनआरआय भक्ताने साईबाबांच्या दानपेटीत तब्बल 25 हजार यूएस डॉलर (अंदाजे 17 लाख रुपये) दिले आहेत.
श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या अन्नदान योजनेसाठी ही रक्कम भक्ताकडून जमा करण्यात आली आहे. सीता हरिहरण असं दानशूर महिलेचं नाव असून गेल्या आठवड्यात कुटुंबीयांसमवेत शिर्डीत आली असताना त्यांनी हे दान केलं.
तीन पोस्ट डेटेड चेक्सच्या माध्यमातून त्यांनी ही रक्कम दिली. येत्या एप्रिल, जुलै आणि सप्टेंबर महिन्यात या रकमेतून इतर भक्तांना मोफत अन्न देण्यात येईल. नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहणाऱ्या सीता यांनी 'ही रक्कम माझी नाही, साईंचीच आहे, त्यामुळे याला दान कसं म्हणावं?' अशी भावना व्यक्त केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement