एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : "मुख्यमंत्री झाल्यावर मला वाटलं पद्धतशीर काम होईल, पण उलट झालं; आता व्याप आणखी वाढला"!

CM Eknath Shinde : चार महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांना बातमीचा मसाला दिला. ते का घडलं, का केलं हे माहीतच आहे. मी मनात काही ठेवत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

CM Eknath Shinde : सुरुवातीला काही पत्रकार म्हणायचे तुम्ही दोघेच (मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री) आहात, तोपर्यंत निर्णय घ्या. दुसरे आल्यानंतर निर्णय घेताना अडचणी येतील. मग आम्ही निर्णय घेतले की हे दोघेच मंत्रिमंडळ चालवत आहेत, अशा बातम्याही करायचे, अशी मिश्कील टिप्पणी एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री झाल्यावर मला वाटलं की पद्धतशीर काम होईल, पण उलट झालं. आता व्याप आणखीनच वाढल्याचे ते म्हणाले. चार महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांना बातमीचा मसाला दिला. ते का घडलं, का केलं हे माहीतच आहे. मी मनात काही ठेवत नसल्याचेही ते म्हणाले. 

एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, राजकीय मंडळींप्रमाणेच पत्रकारांना कुटुंबाला म्हणावा तितका वेळ देता येत नाही. मीडियात मोठा बदल होत असल्याने पत्रकारांची जबाबदारी वाढलेली आहे. सोशल मीडियाने बातमीची सत्यता पडताळणी हे एक मोठं आव्हान पत्रकारांसमोर उभं आहे. सोर्स वाढल्यानं अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे, तो तुम्ही काही प्रमाणात काढताना दिसत आहात.  

एकनाथ शिंदे वाहतूक समस्येवर भाष्य करताना म्हणाले की, एकदा गावाला निघालो तेव्हा चांदणी चौकात ट्रॅफिक लागलं. काही लोक मला भेटले आणि त्यांनी समस्या सांगितल्या. मग तातडीनं कारवाईचे आदेश दिले, तो पूल जमीनदोस्त केल्याने ट्रॅफिक संपलं. पुणे शहरात देखील अशीच समस्या आहे, तेथील वाहतूक कोंडी संपवायची आहे. मुंबईतही वाहतूक कोंडी होते, त्यामुळे आम्ही मेट्रोला मोठी चालना दिली आहे. मेट्रो सर्वत्र सुरू झाली, की आपोआप मार्गांवर वाहनं कमी होतील.

तुझं माझं जमेना अन् तुझ्याविना करमेना

शिंदे पुढे म्हणाले, प्रत्येक बातमी आमच्याच बाजूने द्या असा आमचा आग्रह नाही. मात्र, चांगलं काम केलं असेल, तर ते द्या. चुका दिसल्यास त्या निदर्शनास येणं गरजेचं आहे. ते काम तुम्ही करता. काहींचा समज-गैरसमजअसतो. प्रत्यक्षात भेटल्यानंतर मनातील अड दूर होते. जे भेटतात त्यांना माझा स्वभाव माहीत आहे. तुम्हीही माझ्या संपर्कात आले की लक्षात येईल. तुझं माझं जमेना अन तुझ्या विना करमेना, असं पत्रकार आणि राजकीय मंडळींचं आहे.

जसं राजकीय नेत्यांमध्ये आलबेल नसतं तसंच पत्रकारांमध्येही नसतं. पण फक्त त्या बातम्या छापून येत नाहीत, अन आमच्या येतात इतकाच फरक आहे. म्हणजे आता मी पत्रकारांच्या बातम्या छापा असं म्हणत नाही. सांगायचं इतकंच की प्रत्येक क्षेत्रात अशी गटबाजी असते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget