एक्स्प्लोर

Ajit Pawar: ...तोपर्यंत महाविकास आघाडीत फूट पडू शकत नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण

जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीला आशिर्वाद आहेत. तोपर्यंत मविआत फुट पडणार नाही किंवा लोकांना अडचणदेखील नाही, असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दिलं आहे.

Ajit Pawar:  शिवसेना महाविकास आघाडीतून (Shiv Sena) बाहेर पडणार अशा चर्चा सुरु असतील तर अशा प्रकारच्या चर्चेला अर्थ नसतो. जोपर्यंत शरद पवार (sharad pawar), सोनिया गांधी (soniya gandhi) आणि उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीला आशिर्वाद आहेत. तोपर्यंत यात फुट पडणार नाही किंवा महाविकास आघाडीतील लोकांना अडचणदेखील नाही, असं स्पष्टीकरण देत त्यांनी महाविकास आघाडीत फूट पडणार का? या चर्चेचा विरोधीपक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी पूर्णविराम दिला आहे. ते बारामतीत (baramati) बोलत होते. 

"145 आमदारांचा पाठिंबा मिळवतो तो सरकार स्थापन करतात हे सिद्ध झालेलं नाही"
महाविकास आघाडीच्या आमदारांच्या कामाला स्थगिती दिली आहे. मात्र त्यात देखील काही प्रमाणात स्थगिती उठलेली आहे. त्यात उड्डाणपुलांचा देखील समावेश आहे. व्हाईट बुकमध्ये विधिमंडळाची मान्यता मिळाली आहे. सभागृहाची मान्यता मिळाली आहे, अशा वेळेस ती काम थांबवणं उचित नाही. तुम्ही तुमची नवीन कामे मंजूर करा, त्या कामाला गती द्या, यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.  145 आमदारांचा पाठिंबा मिळवतो तो सरकार स्थापन करतात हे सिद्ध झालेलं नाही त्यामुळे राज्यकर्त्यांनी आपणच कायमचा राहणार आहोत, असं समजू नये आणि तशी विरोधकांना वागणूक देऊ नये, असं त्यांंनी खडसावलं.

'अमोल कोल्हे आणि मी संपर्कात आहोत'
अमोल कोल्हेंचं यादीतून नाव वगळण्यात आलं आहे. यासंदर्भात मला फार माहिती नाही. त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु आहे. मात्र माझं आणि त्यांच्या कायम संपर्क सुरु आहे. ते नाराज आहेत का? किंवा काय नेमकं प्रकरण आहे हे लवकरच सांगू, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

'जुन्या गोष्टी काढून नवा वाद निर्माण करु नये'
देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्ष झाले आहेत. देशात अनेक समस्या अजूनही आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपूर्वी झालेल्या घटनेचा उल्लेख करुन किंवा त्या व्यक्तीचा उल्लेख करुन नवीन वाद निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करु नये, असं स्पष्ट मत त्यांनी राहूल गांधी यांनी सावकरांच्याबाबत केलेल्या विधानावर व्यक्त केलं आहे. राज्यात अनेक समस्या आहेत. राज्यातले महत्वाचे प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात आहेत. त्यासंदर्भात चर्चा होण्याची गरज आहे. पेरण्या, पिकं अडचणीत आले आहे. त्या शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज असल्यचंदेखील त्यांनी म्हटलं आहे. 

'अधिवेशनाचे मुद्दे चर्चा करुन मांडू'
अधिवेशन अजून सुरू व्हायला अजून वेळ आहे. त्यामुळे आताच मी माझ्या मुद्द्यांविषयी माहिती देणार नाही. आम्ही विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलवली आहे. त्यात एकत्र येत आम्ही चर्चा करुन  योग्य ते मुद्दे ठरणार आहोत. त्याची पत्रकारपरिषदे देखील घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

पर्यटनातून रोजगार निर्मीतीकडे लक्ष
पर्यटकांच्या पर्यटनाच्या दृष्टीने आपल्या देशामध्ये केरळ, गोवा, राजस्थान खूप पुढे गेलेली राज्य आहेत.णि बारामती तसं बघितलं तर  महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातला एक महत्त्वाचा तालुका म्हणून तिची ओळख शरद पवार साहेबांच्या नावामुळे निर्माण झालेली आहे. त्यात बारामतीकरांचा साहजिकच योगदान आहे. आता गेले काही वर्ष मी बारामतीकरांचं प्रतिनिधित्व करत आहो. सुप्रिया सुळे खासदारकीचा प्रतिनिधित्व करत आहेत. यातून अनेकांना रोजगार मिळावा पाहिजे हाच आमचा प्रमुख हेतू आहे.  100% मी जरी कुठल्याही पदावर असो किंवा नसो सगळ्यांना जर आपण नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला तर शंभर टक्के नोकऱ्या देऊ शकत नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या करता देखील मुलांना मुलींना संधी मिळाली तर त्याच्यातून त्यांचं कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो म्हणून बारामतीच्या परिसरामध्ये अलीकडच्या काळात आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारची काम घेत आहोत. बारामतीच्या जवळचे फॉरेस्ट आहे वनविभागाचा अधिपत्याखाली येणार आहे. त्यामुळे अनेक रोजगार उपलब्ध होणार आहे. याच परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवले पाहिजे. काही अॅडवेंचर्स गेमदेखील सुरु करायला हवं.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget