एक्स्प्लोर

बावखळेश्वर मंदिर ट्रस्टला 100 कोटींच्या वसुलीची नोटीस!

मुंबई उच्च न्यायालयानं संदिप ठाकूर यांची याचिका निकाली काढली असून बावखळेश्वर मंदिर ट्रस्टला 100 कोटींच्या वसुलीची नोटीस देण्यात आली आहे. यात पाडकामाचे 4 कोटी तसेच 11 वर्ष बेकायदेशीररित्या सरकारी भूखंड वापरल्याचीही वसुली होणार आहे.

नवी मुंबई : शहरातील बावखळेश्वर मंदिराबाबत मंदिर ट्रस्ट आणि संबंधितांना एमआयडीसीनं तब्बल 100 कोटींच्या वसुलीची नोटीस बजावली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनुसार या अनधिकृत बांधकामाच्या पाडकामासाठी आलेल्या खर्चाची भरपाई म्हणून चार कोटी रूपयांची नोटीस मंदिर ट्रस्टला याआधीच पाठवण्यात आली आहे. तसेच साल 2007 ते 2018 पर्यंत सरकारी जमिनीचा बेदायदेशीर वापर केल्याबद्दल 100 कोटींच्या वसुलीची नोटीसही ट्रस्टला धाडल्याची दखल घेत शुक्रवारी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठानं यासंदर्भात संदिप ठाकूर यांनी दाखल केलेली याचिका अखेर निकाली काढली. नवी मुंबईतील महापे येथील ट्रान्स ठाणे क्रीक इंडस्ट्रियल एरियामधील(टीटीसी)एमआयडीसीच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवरील अतिक्रमण करुन अनेक बेकायदा बांधकामे करण्यात आली होती. त्यात बावखळेश्वरच्या भव्य मंदिराचाही समावेश होता. यावर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने 2013मध्येच एका जनहित याचिकेत दिले होते. त्यानंतर गणेश नाईक यांचा वरदहस्त असलेल्या बावखळेश्वर मंदिर ट्रस्टनं हे मंदिर वाचवण्यासाठी वारंवार राज्य सरकारबरोबरच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंतही प्रयत्न केले होते. हे बेकायदा मंदिर प्रसंगी पोलिस संरक्षण घेऊन तोडा असा स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने 22 फेब्रुवारी 2018 ला पुन्हा दिला होता. मात्र, ट्रस्टने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर 8 ऑक्टोबर 2018 ला हे अपील फेटाळण्यात आल्याने ट्रस्टचा सर्वोच्च न्यायालयातील तिसरा प्रयत्नही निष्फळ ठरला. ज्यानंतरच्या कारवाईत कडक पोलिस बंदोबस्तात हे बांधकाम जमिनदोस्त करण्यात आलं. मात्र, या बेकायदेशीर बांधकामाला वरदहस्त देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचं काय? त्यांच्यावर कधी कारवाई होणार असा सवाल करत याचिकाकर्ते संदीप ठाकूर यांचा अर्ज अद्याप प्रलंबित आहे. त्यावेळी एमआयडीसीनं हायकोर्टाला सांगितलं की, याप्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात येईल. काय आहे प्रकरण? नवी मुंबईतील महापे येथील ट्रान्स ठाणे क्रीक इंडस्ट्रियल एरियामधील (टीटीसी) एमआयडीसीच्या कोट्यावधी रुपयांच्या जमिनीवर अतिक्रमण करुन बावखळेश्वर मंदिर ट्रस्टने बेकायदा बांधकाम केले होते. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने हे बांधकाम बेकायदेशी ठरवत 2013 मध्ये कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्याप्रमाणे हे बांधकाम पाडण्यात आले. वाचा - गणेश नाईक अडचणीत! बावखळेश्वर मंदिर ट्रस्टकडून 100 कोटी वसूल करणार, एमआयडीसीची हायकोर्टात ग्वाही Ram Mandir | असं असेल अयोध्येतील नवीन राम मंदिर | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget