एक्स्प्लोर
भगवान गड ट्रस्टला जिल्हा परिषदेकडून कारवाईची नोटीस
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीच्या भगवान गड ट्रस्टला जिल्हा परिषदेने कारवाईची नोटीस पाठवली आहे. यशवंत ग्रामसमृद्धी योजनेतील मंगल कार्यालयाची ईमारत आढळत नसल्याने नोटीस पाठविण्यात आली आहे.
भारजवाडी ग्रामपंचायतीने 2009 साली 9 लाख 99 हजाराचं मंगल कार्यालय भगवान गड ट्रस्टला हस्तांतरित केलं होतं. मंगल कार्यालयात दोन खोल्या आणि हॉलचा समावेश आहे. मात्र सध्याची ईमारत आणि मोजमाप पुस्तीकेतील नोंदीत तफावत असल्याचं आढळलं आहे.
शासकीय ईमारत विनापरवाना जमीनदोस्त केल्याने शासकीय निधीचं नुकसान केल्याचं जिल्हा परिषदेने म्हटलंय. येत्या सात दिवसांत याबाबत ट्रस्टला खुलासा करण्याचं या नोटीशीद्वारे सांगण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement