सोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाबधितांचा आकडा वाढत जातोय. कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहेत. मात्र कोरोना व्यतिरिक्त इतर आजार असलेल्या रुग्णांच्या सोयीसाठी सर्व खासगी हॉस्पिटल, नर्सिंग होम सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले होते. मात्र त्यानंतरही काही नर्सिंग होम/हॉस्पिटल बंद असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. सोलापूर महानगरपालिकेने याची दखल घेत आज 28 खासगी नर्सिंग होम/हॉस्पिटलला नोटीस बजावली आहे.


लॉकडाउनच्या कालावधीत रुग्णालय सुरू असल्याबाबत OPD आणि IPD रुग्णांच्या माहितीसह खुलासा 2 दिवसात सादर करण्याचा सूचना या नोटीसद्वारे देण्यात आल्या आहेत. मुदतीत खुलासा सादर न केल्यास नर्सिंग होम/हॉस्पिटल बंद गृहीत धरून कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील आरोग्य अधिकारी डॉ. संजय नवले यांनी नोटीसमध्ये सांगितलं आहे.


लॉकडाऊनच्या कालावधीत नर्सिंग होम/हॉस्पिटल बंद असल्याच्या तक्रारी विभागास प्राप्त होत होत्या. त्यामुळे या नर्सिंग होम/हॉस्पिटलनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 आणि महाराष्ट्र शुश्रुषागृह अधिनियम 1949 अंर्तगत नियमांचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या कायद्यांचा भंग करत रुग्णालय सुरू न ठेवणाऱ्यावर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.


सोलापुरात आज सर्वाधिक 50 कोरोनाबाधित रुग्ण आढळले








 सोलापुरात आज एकाच दिवसात तब्बल 50 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉसिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे सोलापुरतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 435 वर पोहोचला आहे. तर मृतांच्या संख्येत ही आज तिघांची भर पडली आहे. त्यामुळे सोलापूरात कोरोनामुळे आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज दिवसभरात 7 जणांनी कोरोनावर मात केली. तर  आतापर्यंत 165 रुग्ण कोरोनातुन मुक्त झाले आहेत. उर्वरित 241 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज आढळलेले सर्व रुग्ण हे सोलापूर शहर परिसरातील आहेत. त्यामुळे शहरातील बधितांची एकूण संख्या 429 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 28 वर पोहोचली आहे. ग्रामीण भागात मात्र परिस्थिती स्थिर असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात 6 रुग्ण आढळलेले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे.



संबंधित बातम्या




CM Thackeray Lockdown 4 | लॉकडाऊन उठवून महाराष्ट्राला धोक्यात टाकणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे