मुंबई : राज्यात आज 2033 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर मुंबई 1185 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 749 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 8 हजार 437 जणांनी यशस्वीरित्या कोरोनाला हरवलं आहे. आज 51 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 249 इतकी झाली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह असेलेल्या रुग्णांचा आकडा आता 35 हजार 058 झाला आहे. पैकी 25 हजार 392 रुग्णांवर सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात 51 करोना बाधितांच्या मृ्त्यूची आज नोंद झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये 23, नवी मुंबईमध्ये 8, पुण्यात 8, जळगावमध्ये 3, औरंगाबाद शहरात 2, अहमदनगर जिल्हात 2, नागपूर शहरात 2, भिवंडीत 1 तर पालघरमध्ये 1 मृत्यू झाला आहे. याशिवाय बिहार राज्यातील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे.
मृत्यूंबाबतची अधिकची माहिती
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 35 पुरुष तर 16 महिला आहेत. आज झालेल्या 51 मृत्यूंपैकी 60 वर्ष किंवा त्यावरील 21 जण आहेत. तर 19 जण हे वय वर्ष 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 11 जण 40 वर्षाखालील आहे. या 51 जणांपैकी 35 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1249 झाली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 82 हजार 194 नमुन्यांपैकी 2 लाख 47 हजार 103 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 35 हजार 58 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3 लाख 66 हजार 242 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 18 हजार 678 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
संबंधित बातम्या
- रेड झोनमधील निर्बंध शिथिल करणे योग्य होणार नाही : उद्धव ठाकरे
- हॉस्पिटलमधील 3 दिवस कठीण, अभद्र विचार मनात येत होते : जितेंद्र आव्हाड