एक्स्प्लोर
Advertisement
गृहराज्यमंत्री रणजीत पाटलांच्या वडिलांवर अदखलपात्र गुन्हा दाखल
अकोला: गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे वडील विठ्ठल पाटील यांच्यावर मारहाणप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीपी माझानं याप्रकरणी पाठपुरावा केला होता. त्यानंतर तब्बल पाच दिवसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 323 आणि 540 या दोन कलमांअर्तंगत मूर्तिजापूर पोलिसांनी विठ्ठल पाटलांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, यानंतर तक्रारदार संजय आठवले यांनी फोनवरुन एबीपी माझाकडे आपली भूमिका स्पष्ट केली. ‘विठ्ठल पाटील यांनी मला शिवीगाळ करत मारहाण केली. पण तरीही त्या पद्धतीनं तपास न होता त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मी नाराज आहे. यासाठीही पोलिसांनी पाच दिवस घेतले. पण एबीपी माझाच्या पाठपुराव्यामुळे किमान हा गुन्हा तरी दाखल झाला. त्यामुळे मी एबीपी माझाचे मनापासून आभार मानतो. मला आशा आहे की, मला नक्कीच न्याय मिळेल.’ असं संजय आठवले म्हणाले.
गृहराज्यमंत्री रणजीत पाटील काय म्हणाले होते?
पोलीस तपासात जे निष्पन्न होईल, त्यानुसार आपल्या वडिलांवर कारवाई केली जाईल, यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नाही. दरवर्षी अॅडमिशनच्या वेळी हे वाद होतात, वडील तो कारभार पाहतात, त्याच्याशी माझा संबंध नाही. असं रणजीत पाटील यांनी सांगितलं होतं.
गेल्या 15 ते 20 वर्षांपासून आपल्या आणि संजय देशमुखांच्या संस्थेत वाद असल्याचं रणजीत पाटलांनी मान्य केलं. दरम्यान, पोलीस तपासात कोणताही हस्तक्षेप करणार नाही आणि कायदा त्याचं काम करेल, असं रणजित पाटील म्हणाले होते.
मुर्तिजापूर तालूक्यातील घुंगशी हे रणजीत पाटील यांचं मूळ गाव आहे. वडील घुंगशी येथेच शेती करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या वडिलांनी कॉलेज कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली होती. मूर्तिजापूर तालुक्यातील भाऊसाहेब देशमुख या कॉलेजमध्ये हा प्रकार घडला होता. देशमुख कुटुंबीयांच्या संस्थेचं हे कॉलेज आहे. रणजीत पाटलांच्या कुटुंबीयांमध्ये आणि देशमुख कुटुंबात 2010 पासून वाद सुरु आहे. मंगरुळतांबे गावात रणजीत पाटलांचं कॉलेज आहे. पण या भाऊसाहेब देशमुख कॉलेजमुळे विद्यार्थी रणजीत पाटलांच्या कॉलेजमध्ये जात नाहीत, असं बोललं जातं. दोन्ही कुटुंबांमध्ये 2010 पासून कायदेशीर लढाई सुरु आहे. रणजीत पाटलांचे वडील आणि दोन वेळा आमदार राहिलेले विठ्ठल पाटील यांनी 2013 साली या कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी केली होती. या कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली. मात्र देशमुख कुटुंबीयांनी पुन्हा मान्यता मिळवली. आता पुन्हा या कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली आहे. पण तरीही कॉलेज सुरु असल्यामुळे विठ्ठल पाटील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन कॉलेजमध्ये गेले. यावेळी कॉलेजच्या शिपायाला त्यांनी मारहाण केली. शिवाय शिवीगाळही केली. मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी विठ्ठल पाटील यांच्याविरोधात मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र दोन वेळा आमदार राहिलेल्या विठ्ठल पाटील यांना कॉलेज कर्मचाऱ्याला मारहाण करणं शोभतं का, असा सवाल केला जात आहे. संबंधित बातम्या: विठ्ठल पाटलांवर गुन्हा दाखल व्हायला हवा : फुंडकर वडिलांवर गुन्हा दाखल करायला गृहराज्यमंत्र्यांना मुहूर्त मिळेना? वडिलांची कॉलेज कर्मचाऱ्याला श्रीमुखात, रणजीत पाटलांनी मौन सोडलं गृहराज्यमंत्री रणजीत पाटलांच्या वडिलांची कॉलेज कर्मचाऱ्याला मारहाणअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement