एक्स्प्लोर

आठवड्यानंतरही दूधदर जैसे थे, 15 ते 20 रुपयांवर शेतकऱ्यांची बोळवण

आठवडाभर सुरु असलेल्या आंदोलनानंतर दूध संघांना 25 रुपये प्रतीलिटर या भावाने दुधखरेदी करण्याचे आदेश दिल्याचं सरकारने म्हटलं होतं.

उस्मानाबाद : सरकारने केलेल्या दूधदरवाढीच्या घोषणेला आठवडा उलटला आहे. तरीही शेतकऱ्यांना दूधासाठी 25 रुपये प्रतीलिटरचा भाव मिळत नसल्याचं ‘एबीपी माझा’च्या पडताळणीत समोर आलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दूधदरवाढीसाठी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने दूध संघांना 25 रुपये प्रतिलिटर या दराने दूध खरेदी करण्याचे आदेश दिले. पण राज्य सरकारने आम्हाला कोणताही आदेश दिलेला नाही, असा दावा दूध संघानी केला आहे. सरकारने दूधसंघांना दिलेल्या आदेशाला एक आठवडा पूर्ण झाला. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने सरकारच्या या निर्णयाची कितपत अंमलबजावणी झाली, याची पडताळणी केली. यामध्ये दूध संघ शेतकऱ्यांकडून आजही कमी दरातच दूधखरेदी करत असल्याचं समोर आलं आहे. राजू शेट्टींच्या आंदोलनाआधी गायीच्या दुधाला 22 रुपये प्रतिलिटर असा भाव मिळत होता. आंदोलनानंतर अजून एकाही शेतकऱ्याला 25 रुपये दुधाचा दर मिळालेलाच नाही. उलट आज दुधाचे दर दोन रुपयांनी कमी झाले आहेत. सध्या दूध संघ शेतकऱ्यांकडून 15 ते 20 रुपयांच्या भावाने दुधाची खरेदी करत आहेत. त्यामुळे राजू शेट्टींचे आंदोलन आणि राज्य सरकारच्या निर्णयावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान, दूधदरात वाढ करण्यात यावी, अशी मागणी करत राजू शेट्टींनी राज्यभर मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनात शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारच्या निषेध केला. तसंच मुंबई, पुण्यासारख्या शहरांना होणारा दूधपुरवठा रोखण्याचाही प्रयत्न झाला. आठवडाभर सुरु असलेल्या आंदोलनानंतर दूध संघांना 25 रुपये प्रतीलिटर या भावाने दूधखरेदी करण्याचे आदेश दिल्याचं सरकारने म्हटलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Embed widget