एक्स्प्लोर
आता एनओसीशिवाय वीज कनेक्शन मिळणार!

मुंबईः वीज जोडणीसाठी आता कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचं ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी घेण्याची गरज नाही. केवळ अधिकृत ओळखपत्र आणि वास्तव्याचा अधिकृत पुरावा आणि आवश्यक शुल्क भरल्यास वीज जोडणी देता येईल, असं परिपत्रक उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने जारी केलं आहे. कोणत्याही जागेच्या मालकाने वीज जोडणीसाठी अर्ज केल्यास त्या जागेसाठी वीज वितरण परवानाधारकाकडून वीज पुरवठा करण्याची तरतूद विद्युत अधिनियमात आहे. काही वीज वितरण कंपन्या ना हरकत प्रमाणपत्राची मागणी वीज जोडणीसाठी करतात. एनओसीशिवाय आतापर्यंत वीज जोडणी दिली जात नव्हती. मात्र शासनाच्या या नव्या नियमाने सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याचा त्रास वाचणार आहे.
Before You Go
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















