एक्स्प्लोर

राजकीय भूकंप बिहारमध्ये, हादरे महाराष्ट्रात?

बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्यानंतर, त्याचे हादरे महाराष्ट्रातही जाणवणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

पाटणा: बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्यानंतर, त्याचे हादरे महाराष्ट्रातही जाणवणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना बिहारमध्ये नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. राज्यातही सत्तेतील भाजप आणि शिवसेनेचे संबंध ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीपासून प्रत्येक निर्णयावर शिवसेनेनं उठवलेली झोड, मुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या असणाऱ्या समृद्धी महामार्गसारख्या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध, मोदी चोर है च्या घोषणा, आदींमुळे शिवसेना-भाजपमध्ये तणाव असल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरकार शाबूत आहे, पण काही अडचण आलीच, तर अनेक अदृश्य हात सरकार वाचवण्यास तयार असल्याचं सूचित केलं होतं. तर त्याला उत्तर देताना शिवसेनेच्या संजय राऊत यांनी अदृश्य हात दोन्ही बाजूकडे असतात, असं म्हटलं होतं. तिकडे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत तरी शिवसेना आणि भाजप एकत्र असल्याचं चित्र तरी दाखवतील. पण भाजप आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने तयारीला लागले आहे. त्यामुळे बिहारमध्ये जी नवीन समीकरणं तयार होतील, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही काही समीकरण होतील का, भाजप आणि सेनेचे संबंध अजून बिघडतील की पक्ष वाचवण्यासाठी युतीचा संसार वाचवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतील या चर्चेला विधान भवनात उधाण आलं आहे. 5 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे, तर राज्यात पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यामुळे 5 ऑगस्टनंतर राज्यात काही घडामोडी होतील का याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागून आहे. संबंधित बातम्या नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ पाठीशी : मुख्यमंत्री   अदृश्य ‘हात’ दोन्ही बाजूकडे असतात : संजय राऊत  कोण कुणाला फोडणार? बिहारचं राजकीय गणित काय असेल?  राजीनाम्यानंतर नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया  नितीश कुमार यांचा राजीनामा, मोदींकडून अभिनंदन!

महत्त्वाच्या बातम्या

सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
अकोला शिक्षक मतदारसंघ निवडणूक! मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मतदान मात्र, आमच्या उमेदवाराला करा, ठाकरेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
अकोला शिक्षक मतदारसंघ निवडणूक! मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मतदान मात्र, आमच्या उमेदवाराला करा, ठाकरेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी

Embed widget