एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नितीन काळजे पिंपरी चिंचवडचे पहिले अविवाहित महापौर
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये महापौरांच्या खुर्चीवर बसत नितीन काळजे यांनी दोन इतिहास घडवले आहेत. एक म्हणजे ते भाजपचे पहिले महापौर ठरले आहेत तर दुसरं म्हणजे नितीन काळजे पहिले अविवाहित महापौर आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचे महापौर आणि उपमहापौर विराजमान झाला. भाजपचे नितीन काळजे महापौरपदी तर शैलजा मोरे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.
दरम्यान पिंपरी चिंचवडचे नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे यांनी बैलगाडीत बसून महापालिकेत प्रवेश केला आहे
जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि माजी पालकमंत्री अजित पवार यांच्यात शेवटच्या क्षणी झालेल्या चर्चेतून ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे नितीन काळजे महापौरपदी बिनविरोध
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने 128 पैकी सर्वाधिक म्हणजे 77 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे भाजपचाच महापौर बसणार हे नक्की होतं. मात्र, राष्ट्रवादीने उमेदवारी दाखल केल्याने निवडणुकीची औपचारिकता पार पडणार होती. मतदानापूर्वी राष्ट्रवादीने माघार घेतल्याने भाजपचे नितीन काळजे महापौरपदी विराजमान झाले.
दरम्यान सध्या भाजपत सुरु असलेल्या गटबाजीची सांगड घालत शहराचा विकास करायचा आहे, अशी इच्छा काळजे यांनी व्यक्त केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement