एक्स्प्लोर
शिर्डीतल्या सभेदरम्यान स्टेजवरच नितीन गडकरींना भोवळ
भारतीय जनता पक्षाने आज शिर्डी येथे प्रचारसभेचे आयोजन केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या सभेला संबोधित करत होते. परंतु स्टेजवर भाषण सुरु असताना गडकरींना भोवळ आली.

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाने आज शिर्डी येथे प्रचारसभेचे आयोजन केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या सभेला संबोधित करत होते. परंतु स्टेजवर भाषण सुरु असताना गडकरींना भोवळ आली. त्यामुळे त्यांनी भाषण मध्येच सोडून दिले. स्टेजवर उपस्थित नेत्यांनी गडकरींना सावरले. कार्यकर्त्यांनी गडकरींना लगेच सरबत दिलं. काही वेळानंतर गडकरींना बरे वाटू लागल्यानंतर त्यांनी सभेला उपस्थित लोकांना अभिवादन करुन मंच सोडला.
गडकरींना मधुमेहाचा त्रास आहे. त्यात शिर्डीत तापमानाने 40 अंशांचा आकडा केव्हाच पार केला आहे. त्यामुळेच गडकरींना भोवळ आली असल्याचे बोलले जात आहे. सातत्याने प्रचारसभा, दौरे आणि त्यात महाराष्ट्रातलं वाढत तापमान यामुळे गडकरींची दमछाक होत आहे. त्यामुळेच आज त्यांची तब्येत बिघडली.
व्हिडीओ पाहा

चार महिन्यांपूर्वी अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभात नितीन गडकरी हजर होते. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीतानंतर खुर्चीवर बसताना गडकरींना भोवळ आली होती. तेव्हादेखील आजच्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. कार्यक्रमानंतर काही वेळांनी ट्वीट करुन गडकरींनी तब्येत बरी असल्याची माहिती दिली होती. तसेच मधुमेहामुळे भोवळ आल्याचेदेखील सांगितले होते.
गेल्या काही महिन्यांपासून गडकरींची प्रकृती फार बरी नसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्यांच्या वजनातदेखील घट झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज