NIA Raids Live Updates : देशात NIAचं 'ऑपरेशन PFI'! राज्यात मुंबई, ठाण्यासह मराठवाडा, विदर्भात छापेमारी, अनेक संशयित ताब्यात
NIA Raids Live Updates : महाराष्ट्रासह 8 राज्यांत एनआयएनं छापे टाकलेत. महाराष्ट्रात औरंगाबाद, सोलापूरसह 50 ते 55 ठिकाणी छापासत्र सुरु आहे.
Buldana News : बुलढाण्यातील पीएफआयचा पदाधिकारी ईखलास खान समीर खान वय 27 वर्ष रा जोहर नगर याला बुलढाण्यातुन आज सकाळी एटीएस ने ताब्यात घेतलं आहे. दरम्यान बुलढाणा येथे पीएफआयचे जिल्हाध्यक्ष हाफीस रईस यांच्या नेतृत्वाखाली संतप्त 10 पीएफआय चे पदाधिकाऱ्यांनी बुलडाणा शहर पोलिस ठाण्या समोर रास्ता अडवून निदर्शने केले. यावेळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. याठिकाणी तात्काळ पोलिसांनी धाव घेत आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पी इफ आय चा ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्यांचे दोन भाऊ हे पोलिसांत असून एक औरंगाबाद पोलीसात तर दुसरा बुलढाणा पोलिसांत आहे.
Jalna: पहाटे चंदनजीरा पोलिसांनी कन्हैयानगर भागातून पीएफआयच्या माजी जिल्हाध्यक्षाला ताब्यात घेतलं आहे. यापूर्वी सुद्धा जालना येथील एकाला NIA-ATS ने ताब्यात घेतले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने कन्हैयानगर भागातून पोलिसांनी पहाटे ही कारवाई केली आहे. ज्यात PFI चा माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या मोहम्मद सलमान खान ( वय 25 वर्षे) याला ताब्यात घेतलय.
नांदेड येथून आज आबेद अली मोहंमद अली खान याला एटीएसने ताब्यात घेतले आहे. ऑटोमोबाईल्सचे दुकान असलेल्या आबेदचं बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याच्या घरात आई,तीन भाऊ, पत्नी-मुलं तो स्वतः आहे. तर तीन भावापैकी दोन नंबरचा तो आहे. गेल्या सात वर्षांपासून तो PIF चा पूर्णवेळ सदस्य आहे. विविध ठिकाणी आंदोलन करून प्रक्षोभक भाषणे अनेक वेळा याच्याकडून करण्यात आले असून, तो नांदेड येथील PIF चा प्रमुख कार्यकर्ता आहे. त्यामुळे आज NIA आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कार्यवाही करत याला ताब्यात घेतलंय. नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील तो रहिवाशी आहे.
Beed NIA and ATS Raids On PFI : बीडमधून एका पीएफआयच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतली ताब्यात
यापूर्वी एक जण एटीएस च्या ताब्यात आहे आज सकाळी बीड शहर पोलीसानी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
Pune NIA and ATS Raids On PFI : पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरातून 6 जणांना चौकशीसाठी घेतलं ताब्यात. घोषणाबाजी आणि एनआयएच्या (NIA) कारवाईच्या पार्शवभूमीवर घेतलं ताब्यात चौकशी सुरू आहे.
Pune NIA and ATS Raids On PFI : पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरातून 6 जणांना चौकशीसाठी घेतलं ताब्यात. घोषणाबाजी आणि एनआयएच्या (NIA) कारवाईच्या पार्शवभूमीवर घेतलं ताब्यात चौकशी सुरू आहे.
Thane NIA and ATS Raids On PFI : पीआयएफ प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने चौघांना अटक केली.
त्यापैकी दोघांना मुंब्र्यातून, एकाला कल्याण आणि एकाला भिवंडीतून अटक करण्यात आली आहे.
हे चौघेही पीआयएफचे सक्रिय सदस्य आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईतूनही पीआयएफ सदस्यांना ताब्यात घेण्यात आली आहे.
NIA-Maharashtra ATS Raids On PFI: गेल्या आठवड्यात एनआयए आणि एटीएसने कारवाई करत देशभरातून पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा एटीसने कारवाई करत राज्यभरातून 50 ते 55 पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ज्यात मराठवाड्यातील औरंगाबाद,नांदेड, जालना आणि परभणी येथील पीएफआयच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने एटीएसने ही कारवाई केली आहे.
NIA-Maharashtra Raids On PFI : दहशतवाद्यांशी संबंधित आरोपांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (Maharashtra ATS) मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. औरंगाबाद (Aurangabad) आणि सोलापूरमधून (Solapur) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front Of India- PFI) कार्यकर्त्यांना एटीएस आणि एनआयएने ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच पीएफआयच्या कार्यलयांवर देशभरात छापेमारी झाली होती. जवळपास 100 जणांना अटक करण्यात आली होती.
महाराष्ट्रात एनआयए आणि एटीएसकडून संयुक्त कारवाई करण्यात आली होती. सोमवारी मध्यरात्री तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा कारवाई केली.
NIA Raids on PFI : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) पुन्हा एकदा अॅक्शनमोडमध्ये आली असून देशभरात कारवाईचा सपाटा सुरु झाला आहे. देशभरात 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (PFI) च्या ठिकाणांवर छापेमारीचा दुसरी फेरी सुरु आहे. एनआयएसह इतर यंत्रणांनी पुन्हा एकदा देशभरातील 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (Popular Front of India) च्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, NIA नं कारवाईचा दुसरा राऊंड सुरु केला आहे. अलिकडेच एनआयएनं केरळमधून (Keral पीएफआय सदस्य शफिक पैठला अटक केली होती. त्यामुळे यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाटणा रॅली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या निशाण्यावर असल्याचे चौकशीदरम्यान उघड झालं होतं.
पार्श्वभूमी
NIA Raids Live Updates : दहशतवाद्यांशी संबंधित आरोपांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (Maharashtra ATS) मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. औरंगाबाद (Aurangabad) आणि सोलापूरमधून (Solapur) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front Of India- PFI) कार्यकर्त्यांना एटीएस आणि एनआयएने ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच पीएफआयच्या कार्यलयांवर देशभरात छापेमारी झाली होती. जवळपास 100 जणांना अटक करण्यात आली होती.
महाराष्ट्रात एनआयए आणि एटीएसकडून संयुक्त कारवाई करण्यात आली होती. सोमवारी मध्यरात्री तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा कारवाई केली.
औरंगाबादमध्ये कारवाई
औरंगाबाद एटीएस आणि पोलिसांनी मोठी कारवाई करत पीएफआयचे आणखी 13 ते 14 कार्यकर्ते ताब्यात घेतले. एकाच वेळी पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. औरंगाबाद पोलीस आणि एटीएसकडून रात्रभर छापेमारीची कारवाई सुरू होती.
सोलापूरमधून एकजण ताब्यात
सोलापूरमध्येही PFI विरोधात NIA ने कारवाई केली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. सोलापूरमधून NIA ने एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. ताब्यात घेतलेल्या या व्यक्तीला NIA च्या पथकाने आपल्या सोबत चौकशीसाठी दिल्लीला नेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
देशभरात पुन्हा छापेमारी
राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्थानिक तपास यंत्रणांसह पुन्हा छापेमारी केली. प्राथमिक वृत्तानुसार, तपास यंत्रणांनी आसाममधून 7 जणांना आणि कर्नाटकमधून 10 जणांना अटक केली आहे. यामध्ये पीएफआय आणि एसडीपीआयच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. देशभरात आठ राज्यांमध्ये छापेमारी सुरू आहे.
आसाममध्ये आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पीएफआयशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी सुरू केली. यावेळी सात जणांना अटक करण्यात आली.
देशविरोधी कारवायांचा आरोप
पीएफआय ही संघटना देशविरोधी कारवायात असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी ठेवला आहे. 2047 पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. पीएफआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या हत्येचा कट आखला असल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -