एक्स्प्लोर
सिंधुदुर्गतील आंगणेवाडीत नवजात बालिका बेवारस स्थितीत
एका चारचाकी कारमधून काही तरुण या बालिकेला सोडून गेल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. मालवण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

सिंधुदुर्ग : अंगणवाडीत सुमारे एका महिन्याची नवजात बालिका बेवारस स्थितीत आढळली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिकस्थळ असलेल्या आंगणेवाडी भराडी मंदिर परिसरात हा प्रकार समोर आला. रविवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.
पोलीस पाटील गोविंद सावंत यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत मालवण ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले आहे.
एका चारचाकी कारमधून काही तरुण या बालिकेला सोडून गेल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. मालवण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आंगणेवाडी येथील बंद असलेल्या अंगणवाडीच्या दिशेने एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. ग्रामस्थांनी लगेचच त्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी अंगणवाडीच्या बाहेर व्हरांड्यात अंदाजे एका महिन्याची नवजात बालिका बेवारस स्थितीत आढळून आली.
आंगणेवाडी परिसरातील कोणत्याही ग्रामस्थाचे हे नवजात बालक नाही. त्यामुळे हे बालक आले कुठून याचा प्रश्न सर्वांना पडला आहे. पोलीस पाटील सावंत यांनी मसुरे दूरक्षेत्राच्या पोलिसांना याबाबत माहिती दिली.
मालवण ग्रामीण रुग्णालय येथे बलिकेची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासात सुमारे एक महिना कालावधीची बालिका असल्याचे समोर आले. आरोग्याच्या सुरक्षेच्या विचार करत बालिकेला ओरोस जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. उपचारानंतर बालिकेला बालसंगोपन केंद्रात पाठविण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
