Chandrakant Patil : चंद्रकांतदादा हिमालयात जा, राष्ट्रवादीकडून तिकीट बूक, एसी थ्री टायर तिकीट पाठवणार
Chandrakant Patil : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हरिद्वारचे रेल्वे तिकिट काढून दिले.
Chandrakant Patil : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हरिद्वारचे रेल्वे तिकिट काढून दिले. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करुन देताना हरिद्वारचे तिकिट काढून दिले. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास हिमालयाला जाईल, असं वक्तव्य केले होते. याच वक्तव्याची आठवण करुन देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांना हरिद्वारचे तिकिट काढून दिले.
कोल्हापूर जिल्ह्यात पोटनिवडणुक घ्या, जर त्या निवडणूकीत पराभव झाला तर राजकरण सोडून हिमालयात जाईल, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. शनिवारी कोल्हापूर पोटनिवडणूकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजा राजापुरकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मुंबई ते हरिद्वार थ्री टायर एसी तिकीट काढलं आहे. शिवाय हरिद्वार ते हिमालय खेचर सेवा मिळण्यासाठी बोलणी देखील केली असल्याची माहिती दिली आहे.
कोल्हापूर उत्तरच्या पराभवाची जबाबदारी स्विकारत चंद्रकांतदादांनी हिमालयात जावं : आमदार अमोल मिटकरी
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाबद्दल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आनंद व्यक्त केलाय. हनुमानजयंतीच्या दिवशी हनुमानाची गदा कोल्हापूरकरांनी भाजपच्या डोक्यात मारल्याचं मिटकरी म्हणालेय. आता भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्विकारत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटलांनी आता तपश्चर्येसाठी हिमालयात जावं असा टोला मिटकरींनी चंद्रकांत पाटील यांना लगावलाय.
जयश्री जाधव यांचा विजय -
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा 18,901 मतांनी विजय झाला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला. तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं. एकूण 26 फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला.