VIDEO | अजित पवारांच्या पत्नी 'तेरे मेरे सपने', गातात तेव्हा....
पवारांच्या कुटुंबातील सेलिब्रेशन खास असण्याचं कारण म्हणजे इथं कार्यक्रम किंवा प्रसंग कोणताही असो, संपूर्ण कुटुंब एकत्र येतं आणि मगच या क्षणांचा मनमुराद आनंद घेतं.

मुंबई : सण- उत्सव किंवा मग कोणताही समारंभ, शरद पवार यांच्या कुटुंबामध्ये प्रत्येक क्षण अगदी आनंदात साजरा केला जातो. पवारांच्या कुटुंबातील सेलिब्रेशन खास असण्याचं कारण म्हणजे इथं कार्यक्रम किंवा प्रसंग कोणताही असो, संपूर्ण कुटुंब एकत्र येतं आणि मगच या क्षणांचा मनमुराद आनंद घेतं.
सध्या याचीच एक झलक सोशल मीडियावरील एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पवार कुटुंबामध्ये संगीत मैफल रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांची बहीण, नीता पाटील यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त एका खास समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवरुन या क्षणांचा व्हिडीओ शेअर केला.
सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या पोस्टमध्ये त्यांच्या कुटुंबातील मंडळी अतिशय मनमुरादपणे या क्षणांमध्ये रमले असून त्यांच्यात गाण्यांची सुरेल मैफलही रंगल्याचं पाहायला मिळत आहे. यात लक्ष वेधत आहेत त्या म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार.
कुटुंबीयांच्या साथीनं त्या 'तेरे मेरे सपने.... ' हे गाणं गाताना दिसत आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यामध्ये गाताना दिसत नसल्या तरीही त्यांनीच हा व्हिडीओ आणि हे क्षण सर्वांच्या भेटीला आणले आहेत हेसुद्धा तितकंच खरं. सोशल मीडियाच्या माध्यमातून पवार कुटुंबीय कायमच अनेकांचं लक्ष वेधतं हेच पुन्हा एकदा या व्हिडीओमुळं सिद्ध होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
