एक्स्प्लोर

सीमा भागातील वाहनांवरील हल्ले 24 तासांत थांबले नाहीत तर वेगळी भूमिका घेऊ; शरद पवारांचा इशारा 

Maharashtra Karnataka Border Dispute : सीमा भागातील वाहनांवरील हल्ले 24 तासात थांबले नाहीत तर वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय.

Maharashtra Karnataka Border Dispute  :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आता वेगळी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. या विषयात राज्य सरकारने भूमिका घेणं गरजेचं होतं. मात्र ती भूमिका घेतली जात नाही. आज हल्ले झाले त्यामुळे सीमाभागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. येत्या 24 तासात वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलाय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जतमधील गावांवर हक्क सांगितल्यापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. याच पार्श्वभूमीवरशरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.  

बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड संघटनांकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेताल. पुण्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक बसेसना काळा आणि भगवा रंग लावला. तर विविध संघटना ट्रकवरील हल्ल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आता वेगळी भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचा इशारा दिलाय. 

"कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडे जी वक्तव्य केली आहेत त्याने सीमावादाला वेगळं वळण लागत आहे. त्यांच्या सततच्या वक्तव्यांमुळे सीमा भागातील परिस्थिती  गंभीर बनली आहे. आज बेळगावात महाराष्ट्रातील काही ट्रकवर दगडफेक केली ही गोष्ट अतिशय निषेदार्ह आहे. या घटनेचा निषेध केला पाहिजे. सीमावाद प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा मुद्दाम प्रयत्न केला जात आहे. सीमा भागातील मराठी भाषेच्या लोकांना सतत त्रास दिला जात आहे. सध्या जो वाद सुरू आहे त्याला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य जबाबदार आहेत. हा वाद थांबवायचा असेल तर त्यासाठी आता दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी समन्वयातून मार्ग काढला पाहिजे. शिवाय केंद्राने या प्रश्नावर बघ्याची भूमिका घेऊन नये, असा हल्लाबोल शरद पवार यांनी यावेळी केलाय.     

"देशाच्या ऐक्याला धक्का देण्याचं काम केलं जात आहे. उद्या पासून संसदीय अधिवेशन सुरू होत आहे. मी खासदारांना विनंती करणार आहे की त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घ्यावी आणि सध्याच्या परिस्थितीची माहिती द्यावी. तरी देखील भूमिका घेतली गेली नाही तर आम्हाला भूमिका घ्यावी लागणार आहे. महराष्ट्राने नेहमीच संयमाची भूमिका घेतली आहे. परंतु, संयमाला देखील मर्यादा असतात. परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर बेळगावला जाणार, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

महत्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द मात्र सीमेवर महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget