NCP : दिल्ली सेवा विधेयकाच्या मतदानावेळी राष्ट्रवादीच्या चतुराईचं दर्शन, प्रफुल्ल पटेल मतदानासाठी गैरहजर
राज्यसभेतील अजित पवार गटाचे एकमेव खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) मतदानासाठी गैरहजर होते.
नवी दिल्ली : दिल्ली सेवा विधेयकावर (Delhi Services Bill) सोमवारी राज्यसभेत मतदान पार पडलं. या मतदानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) चतुराईचं दर्शन घडलं. मतदानासाठी राष्ट्रवादीनं व्हीपच काढला नव्हता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राज्यसभेतील अजित पवार गटाचे एकमेव खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) मतदानासाठी गैरहजर होते. याचं कारण म्हणजे प्रफुल्ल पटेल जर आले असते, आणि त्यांनी सरकारच्या बाजूनं मतदान केलं असतं, तर शरद पवार गटाला कारवाई करावी लागली असती. त्यामुळे वेगळा वाद निर्माण झाला असता. हे सगळं टाळण्यासाठी राष्ट्रवादीनं तेरी भी चुप, मेरी भी चुप ही रणनीती स्वीकारली असंच म्हटलं पाहिजे.
पक्षातील अंतर्गत वादात कारवाईचा मुद्दा, राज्यसभेतील विधेयक राष्ट्रवादीने शिताफीने टाळला. मात्र राष्ट्रवादीची खरी परीक्षा अविश्वास प्रस्तावाच्या मतदानावेळी येणार राज्यसभेतल्या मतदानासाठी प्रफुल्ल पटेल यांची गैरहजेरी खूप काही सांगून जातो. राष्ट्रवादीचे लोकसभेत पाच खासदार आहेत, त्यापैकी अजित पवार गटाकडे एकटे सुनील तटकरे आहेत तर बाकीचे चार खासदार शरद पवार गटाकडेच आहेत, त्यात गटनेता सुप्रिया सुळेच आहेत. अविश्वास प्रस्तावावेळी राष्ट्रवादी कोणती रणनीती स्वीकारणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील काका-पुतण्यांच्या गटांतील राजकीय संघर्ष आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. शरद पवार सत्तेत असोत वा नसोत, बहुमतात असोत वा नसोत मात्र महाराष्ट्राच्या राजकरणात शरद पवार 'फॅक्टर' महाराष्ट्राच्या सर्वात महत्वाचा मानला जातो. त्यात निवडणूक आयोगाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष एकसंध आहे त्यात कोणतीही फूट पडलेलली नाही. पक्षात दोन गट पडलेले नाहीत, अशी भूमिका शरद पवारांनी आयोगाकडे माांडली आहे.पक्षात फूट पडल्याने दोन्ही गटांनी आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला होता.राष्ट्रवादीत अद्याप ही लढाई धीम्या गतीनं सुरु आहे.
ना विधानसभा, ना लोकसभेत कुठेच राष्ट्रवादीच्या गटनेता, व्हिपबाबत अध्यक्षांनी निर्णय घेतले नाहीय. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाच्या निमित्तानं किमान लोकसभेत ती वेळ येऊ शकते. अविश्वास प्रस्तावावेळी राष्ट्रवादीच्याच खासदारांची खरी कसोटी असणार आहे. सभागृहात व्हिपचं उल्लंघन हा पक्षांतर बंदी कायद्यात अपात्रतेसाठीचा मूलभूत मुद्दा ठरतो. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदारांमध्ये कुणाचा व्हिप चालणार?, न पाळल्यास कारवाई होणार का? त्यावेळी देखील राष्ट्रवादीची वेगळी खेळी दिसणार? याची उत्सुकता आहे.
शरद पवारांकडे असणारे खासदार
श्रीनिवास पाटील (लोकसभा), सुप्रिया सुळे (लोकसभा),अमोल कोल्हे (लोकसभा), फौजिया खान (राज्यसभा) आणि वंदना चव्हाण (राज्यसभा)
हे ही वाचा :