(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरोज अहिरेंच्या बाळाचं नाव आहे खास, अडीच महिन्याचा चिमुकला आईसोबत विधानभवनात!
Winter Assembly Session : आमदार सरोज अहिरे यांच्या चिमुकल्याने सर्वांचं लक्ष वेधलंच, पण बाळाच्या नावाचीही चर्चा सर्वत्र सुरु होत आहे.
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार (NCP MLA) सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनी आज हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra winter session) आपल्या चिमुकल्या बाळासह हजेरी लावली. आमदार सरोज अहिरे अवघ्या अडीच महिन्यांचं बाळ कुशीत घेऊन नागपूरमध्ये (Nagpur Adhiveshan) सुरु झालेल्या अधिवेशनात दाखल झाल्या. बाळाला कुशीत घेऊन विधानभवन परिसरात आलेल्या सरोज अहिरे यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
सरोज अहिरे या नाशिकमधील (Nashik) देवळाली या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी विजय मिळवला आणि विधानसभेत पाऊल ठेवलं. मागील वर्षीच म्हणजे फेब्रुवारी 2021 मध्ये सरोज अहिरे विवाहबद्ध झाल्या. एकीकडे संसार-कुटुंब तर दुसरीकडे मतदारसंघ आणि राजकारण अशा भूमिकेत आमदार अहिरे दिसत आहेत.
Winter Assembly Session : अडीच महिन्याच्या बाळाचं नाव काय?
आमदार सरोज अहिरे यांच्या चिमुकल्याने सर्वांचं लक्ष वेधलंच, पण बाळाच्या नावाचीही चर्चा सर्वत्र सुरु होत आहे. सरोज अहिरे यांच्या बाळाचं नाव प्रशंसक (Prashansak) असं आहे.
अडीच महिन्याचा प्रशंसक आई सरोज अहिरेंशिवाय राहत नाही. म्हणून त्या आपल्या बाळाला घेऊनच आज विधानभवनात पोहोचल्या. विधानभवनात लहान बाळांसाठी करण्यात आलेल्या विशेष कक्षात प्रशंसकला ठेवून त्या विधानसभेच्या कामकाजात सहभागी झाल्या.
Winter Assembly Session : दोन्ही कर्तव्य एकाच वेळी
मतदारसंघाचे प्रश्न महत्त्वाचे असून ते विधानसभेत येऊन उचलणे आवश्यक आहे. तसेच अडीच महिन्याच्या बाळाची आई म्हणून त्याच्याबद्दल ही कर्तव्य बजावणं महत्त्वाचं आहे. म्हणून दोन्ही कर्तव्य एकाच वेळी बजावत आहे, असं सरोज अहिरे म्हणाल्या. यावेळी अडीच महिन्याचा प्रशंसक विधानभवनातील राजकीय गोंधळापासून अलिप्त राहून आईच्या कुशीत निवांत झोपला होता. विधानभवनात लहान बाळांसाठी करण्यात आलेल्या विशेष कक्षात प्रशंसकला ठेवून सरोज या विधानसभेच्या कामकाजात सहभागी देखील झाल्या.
माझ्यासारख्या लाखो महिला आई आणि आपलं कर्तव्य निभावतात. सीमेचं रक्षण करणारी महिला असो किंवा विधानभवनात काम करणारी एखादी आमदार महिला असो ही आपलं कर्तव्य निभावत असते. मतदारसंघासाठी न्याय मागण्यासाठी मी येथे आले आहे, अशा भावना सरोज यांनी एबीपी माझासोबत बोलताना व्यक्त केल्या.
व्हिडीओ पाहा
महत्वाच्या बातम्या
एलन मस्क म्हणाले, ट्विटरच्या सीईओ पदावरून पायउतार होऊ का, जयंत पाटील म्हणतात, आधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटचा निकाल द्या!