Jitendra Awhad : मुंबईशिवरायांच्या काळातही सामाजिक ऐक्याला धोका उत्पन्न करणारा वर्ग होता, तशाच वर्गामुळे आता महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar)  यांनी केले. समाजाला एकसंध करण्याची गरजही त्यांनी बोलताना व्यक्त केली. रविवारी नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ऐक्य परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मणिपूर आणि इतर राज्यांतील दंगलीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले. याच मुद्दावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते  जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महायुती (Mahayuti) सरकारकवर हल्लाबोल केलाय.


⁠पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचा सुपडा साफ होणार - जितेंद्र आव्हाड


महाराष्ट्रात कोल्हापुरात विशाळगडावर जो प्रकार झाला त्यातून दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.⁠ विशाळगडावर एकाएकी जे काही घडलं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही एक ⁠योजनाबद्ध पद्धतीने घडवली गेलेली दंगल आहे. ⁠पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचा सुपडा साफ होणार हे सगळ्या सर्व्हेत दिसले आहे. ⁠त्यामुळे त्यांना असे प्रकार पश्चिम महाराष्ट्रात करायचे असल्याचा आरोप  जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. ⁠2009 साली त्यांनी अशीच मिरज आणि सांगलीत दंगल घडवली होती. त्यावेळी त्यात ⁠मुख्य आरोपी मनोहर भिडे यांचे नाव पुढे आले होते. तेच आता देखील सुरू असल्याचेही ते म्हणाले.


हे तर दरोडेखोर आहेत - जितेंद्र आव्हाड


भर पावसामध्ये विशाळगडावर अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली. आता राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कडक  शब्दांमध्ये फटकारताना भर पावसाळ्यामध्ये कारवाई करण्याची काय गरज होती? अशी विचारणाच अतिक्रमणावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारने केलीय. विशाळगडाची लोक 5 जुलैला पोलिसांना भेटून संगत होती की, आम्हाला येथे भीती आहे. काहीतरी घडणार आहे. मायबाप सरकारने आम्हाला वाचवावे, असं त्यांचे म्हणणे होते. पण प्रशासनानं त्यांचे ऐकलं नाही. परिणामी घडायचे ते घडलं. विशाळगडावरील दर्ग्याचा खूप जुना इतिहास आहे. तिथे शिवाजी महाराज राहीले होते. तिथल्या गावात पहिल्यांदाच मशिद फोडली, कुराण फाडून फेकून दिलं. तिजो-या फोडल्या. हे तर दरोडेखोर आहेत. असा गंभीर आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी  केला आहे.


तीन वर्षांपूर्वी फडणवीसांनी मिरजेच्या समित कदमला पाठवत प्रतिज्ञापत्र करून द्या असं सांगितलं. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अजित पवार यांच्यावर खोटे आरोप करण्यास सांगितले असल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanavis) केलाय. जेल में जाओ नही तो बीजेपी में आओ असं त्यांचं धोरण असल्याचं देशमुख म्हणाले आहेत. या विषयी भाष्य करताना   जितेंद्र आव्हाड म्हणले की, मला या प्रकरणात काही माहिती नाही. मला कोणी काही सांगितलेल नाही. त्यामुळे मी काही बोलणं योग्य ठरणार नाही. असे म्हणत त्यांनी या प्रकरणात अधिक काही बोलण्याचे टाळले आहे. 


हे ही वाचा 


Sharad Pawar: छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकालाही विरोध झाला होता, तोच वर्ग आज महाराष्ट्रातील ऐक्याला धोका निर्माण करतोय: शरद पवार